नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील 'बजेट २०२०' सादर करत केले. मात्र, हे अर्थसंकल्प सादर करताना त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना भाषण आटोपते घ्यावे लागले. त्यांची तब्येत बिघडली असं समजताच त्यांना बसण्यास सांगितले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे भाषण सुरू असताना त्यांचा रक्तदाब कमी झाला. असं वृत्त पीटीआयने दिले आहे.
सकाळी अकरा वाजण्य़ाच्या सुमारास मंत्रीमंडळ आणि संसदेच्या सर्व सदस्यांसमोर त्यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने सीतारामन यांनी हा विक्रमी अर्थसंकल्प उलगडला. निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा दुसरा अर्थसंकपल्प आहे.
त्यांचे आजचे भाषण यापूर्वी केलेल्या भाषणाहून मोठे होते. त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडीत काढला आहे. पण मध्यावरच तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी आपले भाषण मध्यंतरावर बंद केले. देशाच्या आकांक्षा, आर्थिक विकास आणि सामाजिक जपणूक हे तीन मुख्य घटक डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.
सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प सादर करण्यासाठी तब्बल २ तास आणि ४५ मिनिटं इतका वेळ घेतला. मागील वर्षी त्यांनी सीतारामन यांनी दोन तास १७ मिनिटे इतक्या वेळात अर्थसंकल्प सादर केला होता. मागील वर्षीच सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेमध्ये माजी अर्थमंत्री जसवंत सिंग यांना मागे टाकलं होतं. या दोघांच्याही वेळेत दोन मिनिटांचा फरक होता.