...अन्यथा झाली असती अहमदाबाद दुर्घटनेची पुनरावृत्ती! मुंबईहून-कोलकात्याला निघालेलं विमान अचानक...

SpiceJet Flight Makes Emergency Landing In Kolkata: मुंबईहून निघालेल्या विमानाचे कोलकातामध्ये इमरजन्सी लँडिग, प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 10, 2025, 07:14 AM IST
...अन्यथा झाली असती अहमदाबाद दुर्घटनेची पुनरावृत्ती! मुंबईहून-कोलकात्याला निघालेलं विमान अचानक...
SpiceJet flight emergency landing at Kolkata Engine failure mid-air emergency

SpiceJet Flight Makes Emergency Landing In Kolkata: मुंबईतून निघालेल्या स्पाइसजेट विमानाचे इमरजन्सी लँडिग कोलकाता येथे करण्यात आले. विमानाचे इंजिन फेल झाल्यामुळं इमरजन्सी लँडिग करण्यात आल्याचे समोर आले. अचानक विमान कोलकाता येथे उतरवण्यात आल्याने प्रवासीही पॅनिक झाले होते. विमानाचे पायलट आणि क्रूने परिस्थिती सांभाळत विमानाची कोलकाता येथे सुरक्षित लँडिग केली. 

Add Zee News as a Preferred Source

मुंबईहून कोलकत्ताला जाणाऱ्या स्पाइसजेटचे विमान SG670 मधील एक इंजिन खराब असल्याची सूचना मिळाली. त्यानंतर पायलट आणि क्रुने लगेचच विमानाचे इमरजन्सी लँडिग करण्याचा निर्णय घेतला. कोलकत्ता विमानतळाच्या अधिकाऱ्यांनुसार, विमान सुरक्षितपणे विमानतळावर उतरवण्यात आले. रात्री 11.38 वाजता पूर्णपणे इमरजन्सी अलर्ट हटवण्यात आला आहे. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे समोर आले आहे. 

विमानाच्या इमरजन्सी लँडिगची सूचना मिळताच विमानतळावर अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथक तैनात होते. लँडिगनंतर विमानाची तपासणी करण्यात आले. तसंच, इंजिन कशामुळं फेल झाले याची कारण शोधण्यात येत आहे. मात्र वेळेत विमानाच्या इंजिनबाबत लक्षात आल्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे. 

अहमदाबाद विमान दुर्घटना कशी घडली होती?

अहमदाबादहून लंडनला जाणारे प्रवासी विमान गुरुवारी (12 जून 2025) दुपारी अहमदाबादमधील मेघाणीनगरमध्ये कोसळले. या अपघातात विमानातील 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला होता. एअर इंडियाच्या या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. इतकंच नव्हे तर, विमान अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या आणि मेसच्या इमारतीवर कोसळले होते. तेथील 29 जणांचा यात मृत्यू झाला होता. तर, विमानातील फक्त 1 प्रवाशी बचावला होता. विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची संख्या 270 झाली होती. 

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More