भोपाळ : आध्यतमिक आणि राजकीय गुरु भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी इंदूर जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणी न्यायालयाने केयरटेकर पलक, मुख्य सेवादार विनायक आणि शरद या तिघांना अपराधी घोषित केलं. न्यायालयाने या तिघांना 6 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. भय्यू महाराजांच्या आत्महत्येचं गूढ उकळलं आहे. तसेच केअरटेकर पलकबाबतीतही मोठा खुलासा झाला आहे. (spiritual and political guru bhaiyyu maharaj suicide mystery revealed) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं उकळलं गूढ 


भय्यू महाराजांच्या आत्महत्येचा खुलासा हा केअरटेकर पलकच्या फोनद्वारे झाला. सेवेकरी विनायक आणि शरद यांनीच महाराजांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. याबाबतचा खुलासा ड्रायव्हर कैलास पाटील याने पोलीस चोकशीदरम्यान केला. 


"मी पलकला अनेकवेळा कारमधून आश्रमात आणि घरी घेऊन जायचो. यादरम्यान पलक विनायक आणि शरद यांच्याशी बोलायची. याबाबतची माहिती मला  होती", अशी माहिती कैलासने पोलीस चौकशी दरम्यान दिली. यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली.   


3 वर्षांपूर्वी आत्महत्या 


भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्या केली तेव्हा भय्यू महाराज इंदूरमधील सिल्वर स्प्रिंग्स इथल्या घरी होते, अशी माहिती तत्कालीन डीआयजी हरिनारायणचारी यांनी दिली होती.  


पलकचा भय्यू महाराजांवर दबाव 


"भय्यू महाराजांची केअर टेकर पलक त्यांना सतत धमक्या देत होती.  मृत्यूच्या सात महिन्यांनंतर पलकला तिचे 2 विश्वासू साथीदार विनायक दुधाडे आणि शरद देशमुख यांना अटक करण्यात आली", अशी माहिती पोलिसांनी दिली. "पलक भय्यू महाराजांना Whtsapp चॅट आणि  अन्य काही खासगी गोष्टींच्या आधारावर  लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती",असं पोलिसांनी सांगितलं.