उत्तर येईल तोच हुशार! स्टेट बँक ऑफ इंडियाचं मूळ नाव काय?

state bank of india : या प्रश्नाचं उत्तर अर्थ्याहून अधिकांना ठाऊकच नाहीय. तुम्हीही माहित करून घ्या आणि नंतर इतरांनाही सांगा स्टेट बँकेचं मूळ नाव.  

सायली पाटील | Updated: Dec 10, 2024, 02:34 PM IST
उत्तर येईल तोच हुशार! स्टेट बँक ऑफ इंडियाचं मूळ नाव काय? title=
State Bank of India History real name interest rates account

state bank of india : देशातील सर्वात मोठी सरकारी अख्तयारित येणारी बँक म्हणून स्टेट बँकेची ओळख. काळ कितीही पुढे गेला, देशात कितीही बँका आल्या, कितीही कमी दरानं कर्ज दिलं, किंवा एफडीवरील व्याजदर कितीही वाढवला तरीही एसबीआय अर्थात स्टेट बँकेच्या विश्वासार्हतेपुढे सारंकाही फिकं आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. SBI हे खरंतर या बँकेचं आता प्रचलित असणारं नाव. पण, फार आधीपासून या बँकेचं मूळ नाव काय होतं तुम्हाला माहितीये? 

स्वातंत्र्यपूर्व आणि  स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षांमध्ये ही मुळात एक खासगी बँक संस्था होती. 'इम्पिरियल बँक' असं तिचं नाव. 1955 मध्ये या बँकेचं नामकरण करत तिला स्टेट बँक ऑफ इंडिया, ही नवी ओळख देण्यात आली आणि राष्ट्रीयिकरणाच्या प्रक्रियेतून पुढे जात अखेर ही देशात सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक ठरली. 

राहिला मुद्दा मूळ इम्पिरियल बँकेच्या स्थापनेचा, तर ही बँक 3 बँकांच्या विलिनीकरण प्रक्रियतून उदयास आली होतीय. यामध्ये बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ बंगालचा समावेश असल्याचं सांगितलं जातं. 1921 मध्ये वरील तिन्ही बँकांच्या विलिनीकरणातून इम्पिरिअल बँक उदयास आली आणि पुढे 1955 मध्ये तिचीच ओळख होती, State Bank of India. 

हेसुद्धा वाचा : धनाढ्य मुकेश अंबानींना काढावं लागतंय  ₹255000000000 चं कर्ज? इतकी श्रीमंती असतानाही का आली ही वेळ? 

 

भरताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभरात इम्पिरियल बँकेच्या 172 मूळ शाखा आणि 200 हून जास्त उपशाखा होत्या. आताच्या घडीला अधिकृत आकडेवारीनुसार एसबीआयनं बराच पुढचा पल्ला गाठला असून, इथं मालमत्तेचा आकडा 70.415 ट्रिलियन इतका असल्याचं सांगितलं जात आहे. 

आजच्या घडीला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देशातीकल कोट्यवधी खातेधाकांची खाती असून, विविध प्रकारच्या ठेवीही असल्य़ाचं पाहायला मिळतं. खातेधारकांसाठी किमान दरापासून कमाल दरापर्यंतचे गुंतवणुकीचे पर्याय या बँकेकडून उपलब्ध करून दिले जातात. इतकंच नव्हे, तर गृहकर्ज असो किंवा वाहनकर्ज अनेकांचं प्राधान्य याच बँकेला असतं.