जयपूर : अयोध्येमध्ये राम मंदिरचं निर्माण करण्याबाबत श्री श्री रविशंकर यांची मध्यस्थी सुरु आहे. या वादातच आता भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी यावर वक्तव्य केलं आहे.
स्वामी यांनी म्हटलं की, 'मंदिर निर्माणबाबत कोर्ट शेवटचा निर्णय घेईल. मी श्री श्री रविशंकर यांच्याशी बोललो आणि ३ गोष्टींवरच तोडगा निघेल. राम मंदिर परिसरात मस्जिद नाही बनणार. मस्जिद बनणार तर अयोध्येच्या बाहेर. सिया बोर्ड ३ अटींवर तैयार आहे. कोर्टाने निर्णय दिला तर त्यांच्यावर हिंदूंच्या हाते विकला गेल्याचा आरोप नाही होणार.'
स्वामींनी जयपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं आहे. 'पुढच्या दिवाळीपर्यंत राम मंदिरचं निर्माण आयोध्यामध्ये सुरु होईल. राम जन्मभूमी अयोध्यामध्ये एक विशाल मंदिर निर्माण करेल. आता अयोध्येला जाण्याची तयारी केली पाहिजे. मंदिर बनवण्याची तयारी आणि भूमिका ठरली आहे.'
स्वामींनी एक गोष्ट स्पष्ट करत म्हटलं की, 'सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका केली गेली आहे जे पूजेच्या मुळ अधिकाराशी संबधित आहे. ५ डिसेंबरला यावर सुनावणी होईल. मार्चपर्यंत सुनावणी पूर्ण होईल. जुलै-ऑगस्टपर्यंत निर्णय येईल. आम्हाला आशा आहे की निर्णय आपल्याच बाजुने असेल. दिवाळी आधी राम मंदिरचं काम सुरु होऊ शकतं.'