Success Story: मुस्कान UPSC पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण तरी IAS ऐवजी IFS निवडलं कारण

Muskan Jindal Success Story: मुस्कान जिंदाल यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी ही प्रतिष्ठित परीक्षा उत्तीर्ण केली. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 17, 2025, 08:31 PM IST
Success Story: मुस्कान UPSC पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण तरी IAS ऐवजी IFS निवडलं कारण
मुस्कान जिंदाल

Muskan Jindal Success Story: आयएएस अधिकारी व्हावे अशी अनेकांची इच्छा असते. यासाठी भारतात दरवर्षी लाखो उमेदवार यूपीएससी देतात. यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी अनेक उमेदवारांना वारंवार प्रयत्न करावे लागतात. पण काहीजण पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण करतात. मुस्कान जिंदाल यापैकीच एक आहेत. पण आयएएस होण्याचा मार्ग खुला असताना त्यांनी आयएफएस बनण्याचे ठरवले. काय आहे मुस्कान जिंदाल यांची कहाणी? जाणून घेऊया.  

मुस्कान जिंदाल यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी ही प्रतिष्ठित परीक्षा उत्तीर्ण केली. ज्यात त्यांनी ऑल इंडिया 87 वा रॅंक मिळवला. यानंतर भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच आयएएस हा पर्याय त्या निवडतील असे अपेक्षित असताना त्यांनी परराष्ट्रीय सेवा म्हणजेच आयएफएस अधिकारी होण्याचा मार्ग निवडला. यातून त्यांचा अद्वितीय करिअर दृष्टीकोन समोर आला.

मुस्कान यांचा शैक्षणिक प्रवास 

मुस्कान जिंदाल या मूळच्या हिमाचल प्रदेशातील सोलनच्या आहेत. त्या अभ्यासात हुशार होत्या. त्यांना बारावीत 96 टक्के गुण मिळाले. नंतर दिंडीगड पंजाबमधील विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या एसडी कॉलेजमधून कॉमर्स पदवी पूर्ण केली. यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरु केली. त्यांची एकाग्रता, शिस्त, मेहनतीमुळे त्यांना पहिल्याच प्रयत्नात यश आले. 

UPSC चे प्लानिंग

मुस्कान यांनी यूपीएससी तयारी करताना यूपीएससी करताना सेल्फ स्टडीवर लक्ष केंद्रीत केले. मुस्कान यांनी आपले लक्ष्य निश्चित केले आणि त्यांचे पालन केले. दिवसाचे साधारण 7 ते 8 तास अभ्यास केला. यूपीएससी तयारी करताना त्यांनी NCERT पुस्तके,  संदर्भांवर लक्ष केंद्रित केले. आधीच्या परीक्षेत आलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला. 

सोशल मीडियाचा सकारात्मक वापर

मुस्कान यांनी सोशल मीडियाचा सकारात्मक, चांगला वापर केला. सोशल मीडियामुळे आपले लक्ष विचलित होणार नाही, याची काळजी घेतली. त्यांनी आवश्यकतेनुसार मोबाईल फोनचा वापर केला. मुस्कान यांनी यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना खास टीप्स दिल्या.

उमेदवारांना दिल्या टीप्स

तुम्हालादेखील पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण करायची असेल तर सराव करत राहा, ध्येय निश्चित करा, स्वत:च्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा असे त्या सांगतात. कठोर परिश्रम, स्पष्ट उद्देश आणि स्वतःच्या मार्गावर चालण्याचे धाडस हे यशाचं सिक्रेट असल्याचेही त्या सांगतात. मुक्कान यांचा प्रवास यूपीएससी देणाऱ्या उमेदवारांसाठी प्रेरणादायी आहे.