जेलमध्ये बसून कमावले 22,41,00,00,000, स्वत:चे उत्पन्न जाहीर करणारा भारतातील सर्वात मोठा गुन्हेगार; नाव वाचुन थक्क व्हाल

ठग सुकेश चंद्रशेखरचं अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना पत्र लिहीले आहे. परदेशातील उत्पन्नावर 7,640 कोटींचा कर भरण्याची सुकेशची तयारी आहे. या पत्राद्वारे त्याने परदेशातील उत्पन्नाचा तपशील जाहीर केला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 15, 2025, 11:57 PM IST
जेलमध्ये बसून कमावले 22,41,00,00,000, स्वत:चे उत्पन्न जाहीर करणारा भारतातील सर्वात मोठा गुन्हेगार; नाव वाचुन थक्क व्हाल

Sukesh Chandrashekhar : कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekha) हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुकेश चंद्रशेखर  भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा गुन्हेगार ठरला आहे.  सुकेश चंद्रशेखर याने जेलमध्ये बसून  22,41,00,00,000 एवढा पैसा कमावला आहे. खुद्द सुकेश चंद्रशेखर यानेच त्याच्या कमाईचा आकडा जाहीर केला आहे. सट्टेबाजीचा धंदा करणारा  सुकेश चंद्रशेखर  तुरुंग कर्मचाऱ्यांना दरमहा दीड कोटींची लाच देत असल्याचे देखील तपासात समोर आले आहे. 

Add Zee News as a Preferred Source

आरोपी सुकेश चंद्रशेखर हा दिल्लीच्या तिहार जेलमध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. सुकेश चंद्रशेखर याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना एक पत्र पाठवले आहे. यात त्याने आपल्याला कमाईवर टॅक्स 7640 कोटी रुपयांचा टॅक्स भरायचा असल्याचे पत्रात नमूद केले आहे. या पत्रात त्याने त्याचा कमाईचा तपशील नमूद केला आहे. 

एलएस होल्डिंग्ज इंटरनॅशनल आणि स्पीड गेमिंग कॉर्पोरेशन, ऑनलाइन आणि ऑफलाइन गेमिंग आणि बेटिंगमध्ये सुकेश चंद्रशेखर याने पैसे गुंतले आहेत. नेवाडा आणि ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये सुकेश चंद्रशेखर याचे नोंदणीकृत परदेशी व्यवसाय आहेत. अमेरिका, स्पेन, ब्रिटन, दुबई आणि हाँगकाँगमध्येही सुकेश चंद्रशेखर याचा व्यवसाय विस्तारलेला आहे. या सर्व व्यवसाच्या माध्यमातून 22,410 कोटी रुपये कमावले आहेत.

सुकेश चंद्रशेखर याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना  पाठवलेल्या पत्रात उत्पन्नाचा सर्व तपशील नमूद केला आहे. तसेच या उत्पानुसार भारत सरकारला मला 7640 कोटी रुपयांचा टॅक्स भरायचा असल्याचे या पत्रात नमुद केले आहे. 
सुकेशचे पत्र व्हायरल

200कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेहीवर गंभीर आरोप केलेत. नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील वादावर सुकेशनं पत्र लिहिलंयं.. जॅकलिनला सोडावं अशी नोराची इच्छा होती असं या पत्रात त्यानं नमूद केलंय. मात्र जॅकलिनला सोडण्यास नकार दिल्यानं नोरा आपल्याला त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप सुकेशनं केलाय. 

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More