'....तर तुमच्या मुलींना विष देऊन मारुन टाका,' भाजपा आमदाराचं धक्कादायक विधान

T Raja Singh Controversial Statement: गोशामहल येथील आमदार सिंग यांच्याविरुद्ध बीएनएस आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

शिवराज यादव | Updated: Oct 7, 2025, 09:37 AM IST
'....तर तुमच्या मुलींना विष देऊन मारुन टाका,' भाजपा आमदाराचं धक्कादायक विधान

T Raja Singh Controversial Statement: तेलंगणामधील भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी 'लव्ह जिहाद'वर बोलताना वादग्रस्त विधान केलं आहे. 'जर तुमची मुलगी लव्ह जिहादची पीडित झाली असेल आणि परत येण्यास नकार देत असेल तर तिला विष द्या', असं टी राजा सिंह यांनी म्हटलं आहे. अलिकडच्याच एका जाहीर सभेत पैगंबर मोहम्मद यांच्याविरुद्ध कथितपणे अपमानजनक टिप्पणी केल्याबद्दलही ते वादात सापडले होते. 

Add Zee News as a Preferred Source

शनिवारी शालिबांडा पोलिस ठाण्यात सिंह यांच्याविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील गोशामहल येथील आमदार सिंग यांच्याविरुद्ध बीएनएस आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टी राजा सिंह यांच्या विधानांचा निषेध करणाऱ्या अनेक लोकांनी केलेल्या तक्रारींनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

विशेष म्हणजे, सिंग यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. इंडिया हेट लॅबच्या (IHL) अहवालानुसार, 2024 च्या सुरुवातीला मेटाने सिंग यांच्याशी संबंधित दोन फेसबुक ग्रुप आणि तीन इंस्टाग्राम अकाउंट बंद केले होते. या अहवालात या प्लॅटफॉर्मचा वापर संपूर्ण भारतात द्वेषपूर्ण भाषणे आणि प्रक्षोभक सामग्री पसरवण्यासाठी केला जात असल्याचं अधोरेखित करण्यात आलं होतं. 

अहवालात असाही आरोप करण्यात आला आहे की, त्यांनी संपूर्ण भारतात 32 द्वेषपूर्ण भाषणं दिली आहेत, ज्यात किमान 22 भाषणं थेट हिंसाचाराला चिथावणी देणारी होती.

ऑगस्ट 2022 मध्ये, एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून प्रक्षोभक टिप्पण्या केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर, भारतीय जनता पक्षाने (भाजप) त्यांना पक्षातून निलंबित केलं होते. तथापि, अंतर्गत विचारविनिमयानंतर 2023 च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले होते.

2020 मध्ये, "धोकादायक व्यक्ती आणि संघटना" वरील मेटाच्या धोरणानुसार सिंग यांना मेटाच्या प्लॅटफॉर्मवरून बंदी घालण्यात आली होती.

 FAQ

1) टी. राजा सिंग यांच्या 'लव्ह जिहाद' वरील वादग्रस्त विधानाबद्दल मुख्य माहिती काय आहे?
तेलंगणा विधानसभेतील भाजप विधायक टी. राजा सिंग यांनी २ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे विजयादशमी कार्यक्रमात 'लव्ह जिहाद' वरील वादग्रस्त विधान केले. त्यांनी 'लव्ह जिहाद' ही कट रचना असल्याचा दावा करत, मुली 'लव्ह जिहाद'च्या जाळ्यात सापडली तर तिला विष देऊन मारण्याचा सल्ला दिला. तसेच, धार्मिक धर्मांतर, गायी मारण्यासारख्या घटनांसाठी हत्यारेसाठी बक्षिस जाहीर करण्याची मागणी केली आणि मध्य प्रदेशला 'जिहादी मुक्त' करण्याचे आवाहन केले.

2) विधान कसे आणि कशाबद्दल होते?
इंदूरमधील विजयादशमी कार्यक्रमात राजा सिंग यांनी 'लव्ह जिहाद' ही मुस्लिमांकडून हिंदू मुलींना फसवण्याची सनातन धार्मिकतेची योजना असल्याचा दावा केला. त्यांनी म्हटले, "मुली 'लव्ह जिहाद'च्या जाळ्यात सापडली तर तिला विष द्या." तसेच, 'जिहादी'ंना रस्त्यावर गोळ्या घालण्याची मागणी करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींना संबोधित करून देशाला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची विनंती केली. कार्यक्रमात सहभागींना केवळ हिंदू विक्रेत्यांकडून खरेदी करण्याची शपथ घेतली.

3) विधानानंतर काय कायदेशीर कारवाई झाली?
हैदराबाद पोलिसांनी राजा सिंग यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. हे विधान पैगंबर मुहम्मद यांच्याविरुद्ध अपमानजनक असल्याने आणि द्वेषपूर्ण असल्याने दाखल करण्यात आले. पूर्वीही २०२२ मध्ये पैगंबरांवरील विधानांमुळे त्यांना अटक झाली होती आणि भाजपने वर्षभरासाठी निलंबन दिले होते.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More