International Yoga Day 2025 : जगभरात अशांतता वाढली आहे. या वेळी योगाची सर्वात जास्त गरज आहे. योगातून शांती मिळते. योग तणावातून समाधानाकडे घेऊन जातो. योग सर्वांचा आणि सर्वांसाठी आहे. योगाला एक जनआंदोलन बनवू या. हे आंदोलन जगाला शांती, आरोग्य आणि समरसताकडे घेऊन जाईल. या आंदोलनात प्रत्येक व्यक्ती दिवसाची सुरुवात योगाने करेल. या आंदोलनात सर्व समाज योगामुळे एकत्र येईल. योग मानवतेला एका सुत्रात आणेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनी म्हटलं आहे.
योग जीवन शैलीचा भाग
11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी योगाचे महत्व सांगितले. जनतेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या दशकातील योगाच्या प्रवासाकडे पाहताना मला अनेक गोष्टी आठवतात. ज्या दिवशी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जावा असा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी जगभरातील 173 देशांनी आपल्याला पाठिंबा दिला. आजच्या जगात असा पाठिंबा मिळणे ही सामान्य गोष्ट नाही. हा केवळ एका प्रस्तावाला पाठिंबा नव्हता तर तो मानवतेच्या भल्यासाठी जगाचा सामूहिक प्रयत्न होता. आता 11 वर्षांनंतर आपण पाहतो की योग जगभरातील लाखो लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे.
देशभरात 3.5 लाखांहून अधिक ठिकाणी एकाच वेळी योग सत्र
आज 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन एका अनोख्या पद्धतीने साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विशाखापट्टनममधील समुद्रकिनारी तब्बल पाच लाख सहभागींसोबत योग साधना केली. कॉमन योगा प्रोटोकॉल (CYP) सत्रात सहभागी झाले होते. त्यांनी राष्ट्राला सामंजस्यपूर्ण योग सादरीकरणाच्या माध्यमातून नेतृत्व दिलं. देशभरात 3.5 लाखांहून अधिक ठिकाणी एकाच वेळी योग सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
Yoga isn't just an exercise. It is a way of life. Wonderful to join this year's Yoga Day celebrations in Visakhapatnam. https://t.co/ReTJ0Ju2sN
— Narendra Modi (@narendramodi) June 21, 2025
यावर्षी 'एक पृथ्वी, एक आरोग्य' ही थीम मानव आणि निसर्गाच्या आरोग्य नात्याला अधोरेखित करते आहे. भारताच्या 'सर्वे सन्तु निरामयाः' या तत्त्वज्ञानाचा जागतिक प्रसार योग दिनाच्या निमित्ताने अधिक व्यापक होत आहे. यासोबतच MyGov आणि MyBharat सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'योगा विथ फॅमिली' आणि 'योगा अनप्लग्ड' यांसारख्या उपक्रमांतून तरुणांना आणि कुटुंबांना जोडले जात आहे. पंतप्रधान मोदींनी याआधीही नवी दिल्ली, चंदीगड, लखनऊ, मैसूर, श्रीनगर आणि संयुक्त राष्ट्र मुख्यालय येथे योग दिन कार्यक्रमांचं नेतृत्व केलं आहे.
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
AUS
(70.3 ov) 225 (37 ov) 121
|
VS |
WI
143(52.1 ov) 27(14.3 ov)
|
Australia beat West Indies by 176 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.