)
Goa Crime News : गोवा भारतातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. गोव्यात परदेशी पर्यटक मोठ्या संख्यने येतात. महाराष्ट्रातील डॉक्टरने गोव्यात एक अत्यंत भयानक कृत्य केले आहे. सोलापूरच्या डॉक्टरने एका परदेशी महिलेवर बलात्कार केला आहे. या महिलेवर ICU मध्ये उपचार सुरु असताना या डॉक्टरने तिच्यासह घाणेरडे कृत्य केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
गोव्यात परदेशी महिलेवर सोलापूरच्या डॉक्टरने बलात्कार केला आहे. गोव्यातील हेल्थवे हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये मोरोक्कन महिलेवर बलात्कार झाला आहे. पाडित महिला ही 24 वर्षांची आहे. आरोपी डॉक्टर वृषभ दोशी ( वय 28) याला पोलिसांनी अटक केली. आरोपी डॉक्टर हा मुळचा सोलापूर रहिवासी आहे. डॉक्टर वृषभ दोशी हा गोव्यातील हेल्थवे हॉस्पिटलमध्ये कार्यरत होता. आरोपीने नर्सला बाहेर पाठवून तपासणीच्या बहाण्याने या महिलेवर अत्याचार केला. रुग्णालय प्रशासनाने आरोपीला निलंबित करून पीडितेला मदतीचं आश्वासन दिले आहे.
पीडित महिला बिझनेस व्हिसावर भारतात आली होती. दिवार बेटाजवळील एका एनजीओच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती गोव्यात पोहोचली होती. प्रशिक्षणादरम्यान, तिची तब्येत अचानक बिघडली. तिला तातडीने हेल्थवे रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादम्यान आरोपी डॉक्टरने तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बीडच्या लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गोविंद बर्गे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. नर्तकी आणि मृत गोविंद यांच्यात मागील दीड वर्षांपासून प्रेम संबंध होते. गावाकडील घर नावावर कर, बार्शीत शेतजामीन घेऊन दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करेल. अशी धमकी या नर्तिकेने दिली होती. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.