Dr. Subhash Chandra: भारतात क्रिकेटला धर्म मानलं जातं. आज इंडियन प्रीमियर लीग (IPL) जगातील सर्वात मोठी आणि यशस्वी क्रिकेट लीग मानली जाते. पण यशाच्या या शिखराखाली एक महत्त्वाचा अध्याय दडलेला आहे. तो म्हणजे ICL ची निर्मिती. ही लीग उभी करण्यामागे ज्यांची धाडसी आणि दूरदृष्टीपूर्ण भूमिका होती त्या व्यक्तीचं नाव म्हणजे डॉ. सुभाष चंद्रा.
2007 साली प्रथमच भारतात खऱ्या अर्थाने फ्रँचायजी-आधारित T20 क्रिकेट लीग आणण्याचा निर्णय कोणत्याही स्थापित क्रिकेट बोर्डाने नव्हे तर डॉ. सुभाष चंद्रा यांनी घेतला. आज IPL चा डंका जगभरात वाजत असला तरी त्यापूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये फ्रँचायजी लीग म्हणजे काय याची कल्पनाही नव्हती. टीव्ही उद्योगात क्रांती घडवल्यानंतर त्यांनी क्रीडा क्षेत्रात एक नवा प्रयोग केला. देशातील युवा क्रिकेटपटूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे त्यांचे स्वप्न होते.
भारतातील तरुण खेळाडूंना मोठ्या प्रमाणात संधी देणे. क्रिकेटचे व्यावसायिकिकरण करणे. देशात स्पर्धात्मक आणि मनोरंजनप्रधान लीगचा विकास करणे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना भारतात खेळण्यासाठी आकर्षित करणे. त्या काळात BCCI तर्फे T20 फॉरमॅटचा व्यापक प्रयोगही सुरू नव्हता. पण डॉ. चंद्रांनी काळाचा अंदाज घेत T20 लीगची गरज ओळखली.
ICL मध्ये भारतासह पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांमधील खेळाडूंनीही सहभाग घेतला. मध्यमवर्गीय घरांमधील अनेक भारतीय खेळाडूंना ICL मुळे पहिल्यांदा मोठा मंच आणि आर्थिक स्थैर्य मिळालं.
टीम इंडिया माजी खेळाडू कपिल देव यांनी ICL ला सक्रीय साथ दिली. झहीर अब्बास, जोंटी रोड्स यांसारख्या दिग्गजांनी मार्गदर्शन केलं. युवा खेळाडूंना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
ICL च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भारतीय क्रिकेट बोर्ड साकल्याने हलले. 2008 मध्ये BCCI ने आपली स्वतःची T20 लीग IPL सुरू करण्याची घोषणा केली. ICL मुळेच IPL चे बीज पेरले गेले हे अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. BCCI ने ICL ला मान्यता नाकारली, खेळाडूंवर बंदी आणली, अनेक अडथळे उभे केले. परिणामस्वरूप ICL फक्त काही वर्षेच चालली.
मनोरंजनप्रधान T20 क्रिकेट. युवा प्रतिभेला मोठं आर्थिक व्यासपीठ. याची पायाभरणी ICL मुळेच झाली याबद्दल वाद नाही. आज IPL चा जो सुवर्णकाळ आहे, त्याची खरी सुरुवात ICL पासूनच झाली. IPL आज जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आहे. खेळाडूंना मिळणारा मानधनाचा पाऊस, ग्लॅमर आणि स्पर्धात्मकता हे सर्व ICL मुळे शक्य झालं. डॉ. सुभाष चंद्रा यांनी त्या काळात घेतलेला धाडसी निर्णय हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील मोठा टप्पा आहे.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.