ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : पाकिस्ताननं जम्मू काश्मिरसह सीमावर्ती भागात हल्ला करण्याची आगळीक केली...मात्र पाकला असलेली ही युद्धाची खुमखुमी त्यांना चांगलीच महागात पडलेली आहे...कारण, भारताच्या ताफ्यातील 5 अत्याधुनिक अस्त्रांनी पाकचा सुपडासाफ केलाय...भारताची ही शक्तीशाली 5 अस्त्रं कोणती आहेत, पाहुयात.
पाकिस्ताननं स्वत:च्या पायावर कु-हाड मारून घेतली आणि भारतावर हल्ला करण्याचं नको ते धाडस केलं...पाकनं भारतीय सैन्य ठिकाणांना लक्ष्य केलं...पाकनं एकामागून एक मिसाईल आणि ड्रोन डागले...मात्र भारताच्या अत्याधुनिक शस्त्रांनी पाकचे नापाक मनसुबे उधळून लावले...पाकच्या प्रत्येक हल्ल्याला भारतानं जशास तसं उत्तर दिलं...आपल्या शस्त्रांनी पाकच्या मिसाईल आणि ड्रोनचे तुकडे-तुकडे केले....
L 70 गन
शिल्का सिस्टम
S-400 क्षेपणास्र प्रणाली
Zu-23MM गन
UAS संरक्षण प्रणाली, या भारताच्या अत्याधुनिक संरक्षण प्रणालीनं पाकिस्तानला पळता भुई थोडी केली आहे.
पाकनं भारतावर ड्रोन आणि मिसाईलनं हल्ला करण्याची आगळीक केली..मात्र भारताच्या एकाहून एक अस्त्रांनी पाकचे हल्ले परतवून लावले.
- L 70 ही भारताच्या ताफ्यातील 40 MM अॅन्टी एअरक्राफ्ट गन आहे. - विमानं आणि ड्रोनला निशाणा बनवण्यासाठी या गनला डिझाईन करण्यात आलंय
- थेट 4 किलोमीटरपर्यंत या गनची रेंज आहे
- ही गन 300 राऊंड पर मिनिट फायर करू शकते
- शिल्का अँटी एयरक्राफ्ट सिस्टममध्ये 23 MM कॅलिबर गन असते
- एका गनमध्ये 4 बॅरल असतात
- 2.5 किमीपर्यंत हल्ला करण्याची क्षमता आहे
- 20 टन वजनाची ही गन 3400 ते 4000 राउंड प्रतिमिनिट फायर करू शकते
- 50 किलोमीटरच्या वेगानं हे व्हेईकल चालू शकतं
S-400 मिसाईल सिस्टीम ही भारतातील सर्वात शक्तिशाली एअर डिफेन्स सिस्टीम
मिसाईल कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यात सक्षम आहे.
भारताने ही मिसाईल रशियाकडून खरेदी केली आहे. ही मिसाईल अत्याधुनिक फाइटर जेट्सलाही मारून पाडण्याची क्षमता ठेवते.
S-400 एकावेळी 72 मिसाईल्स लाँच करू शकते. S-400 ही मोबाईल लाँग-रेंज सर्फेस टू एअर मिसाईल सिस्टीम S-400 स्वतंत्र रडार सिस्टीम्स आहेत, ज्या 600 किमीपर्यंतच्या हवाई टार्गेट्सचा शोध घेऊ शकतात. S-400 एकावेळी 80 हवाई टार्गेट्सवर नजर ठेवून त्यांना लक्ष्य करू शकते.
ही एक अँटी एअरक्राफ्ट गन सिस्टीम आहे. प्रतिमिनीट 4000 राऊंड फायर करण्याची क्षमता आहे. कमी उंचीवरून जाणा-या ड्रोन आणि हेलिकॉप्टरला टार्गेट करण्याची क्षमता आहे. UAS संरक्षण प्रणाली आकाशातून येणा-या फ्लाईंग ऑब्जेक्टला उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. पाकच्या अनेक ड्रोनला नष्ट केलं
भारताच्या या सर्व शक्तीशाली 5 अस्त्रांनी पाकचे नापाक मनसुबे उधळून लावले...पाकचे ड्रोन आणि मिसाईलचे तुकडे करून पाकला त्यांची जागा दाखवली..पाकिस्तानातून समोर येणारी व्हीडिओ आणि फोटोज आपल्या शस्त्रांची ताकद दाखवायला पुरेशी आहेत.