मुकेश अंबानी, रतन टाटा, अदानी यांच्यापेक्षा देतो सर्वात जास्त दान `हा` व्यक्ती, दररोज देतो 56000000 रुपयांची देगणी, कुठून आली एवढी संपत्ती?
हा श्रीमंत माणूस सामाजिक कार्य आणि धर्मादाय कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. मुकेश अंबानी, रतन टाटा आणि अदानी यासारख्या मोठ्या नावांपेक्षा हा व्यक्ती सर्वाधिक दान धर्म करतो.
आशियातील आणि भारतीय श्रीमंत व्यक्ती म्हटल्यावर आपल्या डोक्यात एकच नाव येतं ते म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचं. पण जेव्हा आपण शहराचा विचार करतो तेव्हा भारताची राजधानी दिल्लीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे तुम्हाला माहितीये? फोर्ब्सने काही दिवसांपूर्वी श्रीमंतांची यादी जाहीर त्यात दिल्लीतील सर्वात श्रीमंत व्यक्तीच नाव जाहीर करण्यात आलंय. विशेष म्हणजे मुकेश अंबानी, रतन टाटा, अदानी यांच्यापेक्षा हा व्यक्ती सर्वाधिक देगणी देतो. दररोज तो 5.6 कोटींची देगणी असं समोर आलंय. कोण आहे हा व्यक्ती आणि त्याकडे एवढी संप्ती आली कुठून? जाणून घेऊयात.
'हा' आहे दिल्लीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती?
फोर्ब्सच्या यादीनुसार, एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि एमेरिटस अध्यक्ष शिव नाडर हे दिल्लीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, त्यांची एकूण संपत्ती $36.8 अब्ज एवढी आहे. मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि शापूर मिस्त्री यांच्यानंतर ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण धर्मादाय अर्थात पैसे दान करण्याच्या बाबतीत, ते त्या सर्वांना मागे टाकतात. नाडर यांनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2,042 कोटी रुपयांची देणगी दिली. म्हणजेच त्याने दररोज 5.6 कोटी रुपये दान केलंय. गतवर्षीही ते देणगीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होते.
शिव नाडर यांचा जन्म 14 जुलै 1945 रोजी तामिळनाडूमधील थुथुकुडी जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला. त्यांना लहानपणी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. कोईम्बतूरच्या पीएसजी कॉलेजमधून इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरची पदवी घेतल्यानंतर त्यांनी 1967 मध्ये वालचंद ग्रुप कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुण्यामधून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या डीसीएम ग्रुपमध्ये संगणक प्रोग्रामर म्हणून काम केले. मात्र त्यांना नोकरीमध्ये रस नव्हता आणि 1976 मध्ये नाडर यांनी त्यांच्या काही मित्रांसह 187,000 रुपयांची गुंतवणूक करून एचसीएलची स्थापना केली.
HCLTech, Infosys, Wipro, Adani Group आणि Reliance Industries सारख्या अनेक भारतीय कंपन्यांनी TIME मासिकाच्या 2024 च्या जगातील सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवलंय. उल्लेखनीय म्हणजे, दिल्लीतील सर्वात श्रीमंत उद्योगपती शिव नाडर यांनी स्थापन केलेली HCLTech या यादीत सर्वोच्च स्थानावर असलेली भारतीय कंपनी म्हणून उदयास आलीय.
HCLTech, नोएडा स्थित IT फर्म, TIME च्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या 2024 च्या यादीत भारत-मुख्यालय असलेली आघाडीची कंपनी म्हणून ओळखली गेली आहे. 1,000 जागतिक कंपन्यांमध्ये एकूण 112 वे स्थान मिळवून, व्यावसायिक सेवा श्रेणीमध्ये जागतिक शीर्ष 10 मध्ये स्थान मिळवलंय. ऍपल, ऍक्सेंचर आणि मायक्रोसॉफ्टने जगभरात पहिल्या तीन स्थानांवर कब्जा केला. मुकेश अंबानी, रतन टाटा, अदानी यांच्या तुलनेत त्यांनी भरपूर पैसे दान केल्यामुळे ते सर्वात उदार व्यक्तींपैकी एक आहेत.
2020 मध्ये, शिव नाडर यांनी एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय आणि ही महत्त्वाची जबाबदारी त्यांची मुलगी रोशनी नाडर मल्होत्रा यांच्याकडे सोपवली. रोशनी आता कंपनीच्या चेअरपर्सन म्हणून काम करते, तर शिव नाडर आता चेअरमन एमेरिटस आणि स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझर म्हणून कंपनीत सामील झाले आहेत.