आजचे राशिभविष्य | शनिवार | 23 फेब्रुवारी 2019

असा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Feb 23, 2019, 11:40 AM IST
आजचे राशिभविष्य | शनिवार | 23 फेब्रुवारी 2019  title=

मेष : व्यापाऱ्यांसाठी वेळ चांगली नाही आहे. कोणाल उधार पैसे देऊ नका. कोणते जुने उधार तुमचा मनस्ताप वाढवेल. नोकरदार वर्गाने संभाळून राहण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी अडचणी वाढतील. कोणत्या तरी गोष्टीची काळजी वाटत राहील. मानसिक तणाव वाढेल. जोडीदारासोबत झालेल्या कोणत्या तरी गोष्टीमुळे मुड खराब होईल. खाण्यापिण्यावर लक्ष द्या. 

वृषभ : ठरवलेली कामे पूर्ण होतील. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत सकारात्मकता येईल. मुलांकडून सहकार्य मिळेल. तुम्ही ठरवलेली कामे मेहनतीने पूर्ण कराल. यामध्ये तुम्हाला यश देखील मिळेल. मित्र आणि भावांकडून सहकार्य मिळेल. जोडीदाराकडून प्रेम आणि सहकार्य कमी मिळेल. 

मिथून : व्यवसायात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. जोडीदाराचा सल्ला तुम्हाला उपयोगी ठरेल. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. तुम्हाला काही चांगल्या संधी मिळतील. चांगले आणि गोड बोलून तुम्ही काम पूर्ण कराल. आरोग्याच्या बाबतीत काळजी वाढेल. खाण्याच्या बाबतीत सावधानी बाळगा. 

कर्क : कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले नसल्याने मूड खराब होण्याची शक्यता आहे. प्रेम आयु्ष्यात सुरू असलेल्या भांडणात काही निर्णय होणार नाही. रोजच्या कामांमुळे अडचणी वाढतील. तुमची ती कामे पूर्ण होतील ज्यांचे प्लानिंग तुम्ही आधीच केले होते. वाद आणि स्पर्धा करण्यापासून दूर राहा. कोणावर अवलंबून राहू नका. आरोग्यामध्ये चढउतार पाहायला मिळतील. 

सिंह : तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. आज तुम्ही लोकांना प्रभावित कराल. तुमच्या विचार करण्याची पद्धत लोकांना आवडेल. तुम्ही दिलेला सल्ला लोकांच्या कामी येईल. कोणती तरी चांगली बातमी कानावर येईल. लव लाईफसाठी दिवस सामान्य असेल. पार्टनर तुमच्या मनातील भावना समजेल. गुडघ्यांचा आजार डोके वर काढेल. 

कन्या : परिवाराची मदत मिळू शकेल. तुमचे मानसिक संतुलन असल्याने पारिवारीक आयुष्यात आनंद मिळेल. काम पूर्ण होऊ शकतात. करियर किंवा गुंतवणूक करण्यासाठी काही चांगल्या संधी मिळू शकतील. पैसे आणि परिवाराच्या स्थितीवर तुम्हाला पूर्ण लक्ष द्यावे लागेल. आरोग्याच्या बाबतीत सुधार होईल. खूप दिवसांपासून सुरु असलेल्या आरोग्याच्या अडचणी दूर होतील. 

तूळ : तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. काही कायदेशीर प्रकरणांमध्ये तुम्ही अडकून राहू शकता. वेळेवर लक्ष द्या. काही खास कामांसाठी तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल. आज अचानक घडणाऱ्या घटनांवर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. तुमचे आरोग्य सामान्य राहील. दिवस चांगला जाईल. 

वृश्चिक : पैंशांच्या बाबतीत नुकसान होईल. काही कायदेशीर प्रकरणांमध्ये तुम्ही अडकून राहाल. वेळेवर लक्ष द्या. काही खास कामांमध्ये तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल. 

धनू : शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करा. आज बॉस सोबत बोलणी करताना सावधानता बाळगा. जे लोक तुमच्या करियरसाठी महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला थोडा त्रास देतील. आज तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्याची संधी थोडी उशीरा मिळेल. कोणते खास पूर्ण करण्याची इच्छा असेल ते पूर्ण न झाल्याने तणाव जाणवेल. आज थोडा धीर धरा. आरोग्य सामान्य राहील. थोडं दमायला होऊ शकेल. 

मकर : तुम्हाला नुकसान होऊ शकेल. दिखावा आणि मोठेपणा करु नका. परिवारामध्ये आर्थिक स्थितीमुळे बाचाबाची होऊ शकते. जास्त जबाबदारी पार पाडावी लागेल. आज तुम्हाला पैशांच्या बाबती सावधान आणि सतर्क राहावे लागेल. नाहीतर नुकसान होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही थोडे त्रस्त असाल. जोडीदारासोबतच्या संबधांमुळे दु:खी होऊ शकता. आरोग्याच्या बाबतीत स्टार कमजोर राहतील. 

कुंभ : करियरमध्ये चांगली बातमी येऊ मिळू शकते. विरोधकांवर तुम्ही प्रभाव पाडू शकाल. जुनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न कराल आणि परिस्थिती तुमच्या बाजूने कराल. नोकरदार वर्गासाठी वेळ चांगली आहे. काही अडकलेली प्रकरणे सुटू शकतात. आज नव्या लोकांशी ओळखी होतील. तुम्हाला मदत मिळू शकते. व्यवसायात काही नवे करण्यात यशस्वी व्हाल. आरोग्याच्या बाबतीत संभाळून राहा. 

मीन : करियरशी संबंधित संवेदनशील निर्णय घेताना सावधानी बाळगा. विचारपूर्वक निर्णय घ्या. विचारपूर्वक गुंतवणूक करा. आज तुम्ही कोणते तरी खास काम विसरू शकता. तुमच्या कामात चुका होऊ शकतात. दुसरी लोक स्वत:ची काम तुम्हाला देऊ शकतील. लव लाईफमध्ये चढउतार पाहायला मिळतील. आरोग्याकडे लक्ष द्या.