Viral Video : सोशल मीडियावर क्षणाक्षणाला अनेक व्हिडीओ शेअर होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे नेटकऱ्यांचे लक्ष वेधण्यात यशस्वी होतात. असाच एक व्हिडीओ आहे, जो सध्या नेटकऱ्यांचे नुसतं लक्ष वेधून घेत नाही आहे, तर हा व्हिडीओ पाहून ते अवाक् होत आहेत. या व्हिडीओमध्ये यार्डमध्ये एक रेल्वेचा डब्बा उभा असलेला तुम्हाला दिसेल. बाहेरुन साधारण दिसणारा हा रेल्वेचा डब्बा जेव्हा तुम्ही आत जाऊन पाहाल तर आश्चर्यचकित व्हाल, हे नक्कीच. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. असं काय आहे या बोगीत चला पाहूयात.
हो, बाहेरून सामान्य दिसणारी ही बोगी एक रेल्वेचा नुसता डब्बा नाही तर अनेक लोकांचं आयुष्य आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की रेल्वेच्या एका डब्याचे पद्धतशीरपणे घरात रूपांतर करण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये हे दाखवले आहे की गरज ही शोधाची जननी आहे आणि मर्यादित साधनसंपत्ती असतानाही लोक आरामदायी जीवन जगू शकतात. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की ती व्यक्ती ट्रेनच्या डब्यात प्रवेश करताच संपूर्ण घरातील लोक आत बसलेले दिसतात. बोगीमध्ये आरामदायी बेड आहेत, एक सोफा देखील दिसतो ज्यावर रेल्वेची पांढरी चादर पसरलेली आहे आणि बरेच लोक तिथे थांबले आहेत. एक माणूस स्वयंपाकघरात काहीतरी काही तर पदार्थ बनवताना दिसत आहे. याशिवाय, कोचमध्ये आरामाशी संबंधित सर्व सुविधा आहेत, ज्या घरात राहण्यासाठी आवश्यक आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो की हा रेल्वेच्या ट्रॅक मशीन विभागाचा कोच आहे. रेल्वेच्या धावत्या कर्मचाऱ्यांना अनेकदा दुर्गम भागात काम करावे लागते आणि त्यांना तात्पुरत्या निवासासाठी असे कोच दिले जातात. या व्हिडीओमध्ये भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे समर्पण देखील दिसून येते, जे कठीण परिस्थितीतही आपले काम कार्यक्षमतेने पार पाडतात.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर @railway.wcr नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 1 लाख 22 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. एका यूजरने कमेंट केली, अरे भाईसाब! हे अगदी घरासारखे आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटलं आहे की, मला ही नोकरी मिळाली तर ठीक होईल. बेरोजगार राहण्यापेक्षा ते बरे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिलंय की, एक हलणारे घर. दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, ट्रॅकवरील आयुष्य.
VAN-W
|
VS |
SAM-W
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Vanuatu Women by 35 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.