धावत्या ट्रेनमध्ये तृतीयपंथ्यांकडून तरुणाला मारहाण; अंगावर उड्या मारल्याने तरुणाचा मृत्यू, Video आला समोर

Transgender Beats Man In Running Train: हा सारा प्रकार घडत होता तेव्हा ट्रेनमधील इतर प्रवाशी मदतीला पुढे आले नाहीत. घटनेचा व्हिडीओ सध्या होतोय व्हायरल.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 22, 2025, 07:45 AM IST
धावत्या ट्रेनमध्ये तृतीयपंथ्यांकडून तरुणाला मारहाण; अंगावर उड्या मारल्याने तरुणाचा मृत्यू, Video आला समोर
मध्य प्रदेशमध्ये घडला हा विचित्र प्रकार

Transgender Beats Man In Running Train: लोकल ट्रेनमध्ये तृतीयपंथीयांकडून पैशांसाठी अनेकदा प्रवाशांवर बळजबरी केली जाते. या तृतीयपंथीयांनी ट्रेनमध्ये अशाप्रकारे भीक मागण्यावर बंदी घालण्याची मागणी वारंवार केली जाते. हे तृतीयपंथीय अनेकदा प्रवाशांशी वादही घालतात. मात्र मध्य प्रदेशमध्ये धावत्या ट्रेनमधील अशाच वादातून तृतीयपंथीयांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला असून या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. सध्या या खळबळजनक घटनेची मध्य प्रदेशमध्ये चांगलीच चर्चा आहे.

कुठे घडला हा प्रकार आणि कोण आहे मयत तरुण?

मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. तृतीयपंथींनी एका तरुणाला ट्रेनमध्ये इतके मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. मृताचे नाव आदर्श विश्वकर्मा असे आहे, तो विदिशा जिल्ह्यातील गंजबासोडा येथील रहिवासी होता. तो त्याच्या कामासाठी दररोज गंजबासोदा ते भोपाळ ट्रेनने प्रवास करत असे.

8 ते 10 तृतीयपंथींनी केला हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 15 मार्च रोजी घडली. मृत आदर्श रात्री गोंडवाना एक्सप्रेसने गंजबासोडाला परतत होता. दरम्यान, सांचीजवळ वाटेत, काही तृतीयपंथी लोकांनी त्याच्याकडे पैसे मागितले आणि जेव्हा त्याने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे आदर्श आणि या तृतीयपंथीयांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की या तृतीयपंथीयांनी आदर्शला धावत्या ट्रेनमध्ये बेदम मारहाण केली. धावत्या ट्रेनमध्ये 8 ते 10 तृतीयपंथींनी आदर्शला इतक्या क्रूरपणे मारहाण केली की या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गंजबासोडा रेल्वे ट्रॅकजवळ आढळला.

कोणीच तरुणाला वाचवण्यासाठी पुढे आलं नाही

या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, तृतीयपंथी आदर्शला रेल्वेच्या डब्यात बेदम मारहाण करताना दिसत आहेत. तृतीयपंथींनी आदर्शला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही तृतीयपंथी आदर्शच्या अंगावर उड्या मारत आहेत. यावेळी ट्रेनमध्ये उपस्थित असलेले सर्व लोक मूक प्रेक्षक बनून राहिल्याचं दिसून आलं. कोणीही आदर्शला वाचवण्याचा आणि तृतीयपंथींना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्हीच पाहा या घटनेचा व्हायरल झालेला व्हिडीओ...

विश्वकर्मा समाजाने व्यक्त केला संताप

विश्वकर्मा समाजाने आदर्शच्या हत्येवर संताप व्यक्त केला आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आणि ट्रेनमध्ये भीक मागण्यावर बंदी घालण्याची मागणी केली.