मुंबई : कोरोना विषाणूचे संकट अधिक गहिरे होत चालले आहे. भारतातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाची  वाढती रुग्ण लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे भारताच्या मदतीसाठी काही देश मदीसाठी पुढे सरसावले आहेत. भारतीय वायुसेनेचे (Indian Air Force) विमान C-17 ग्लोबमास्टर (Indian Air Force aircraft C-17) आज  दुबईहून पश्चिम बंगालमधील पनागढ येथे 6 खाली क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर (Oxygen Containers) घेऊन पोहोचणार आहे, अशी माहिती  अधिकाऱ्यांनी दिली. सतत वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्याबाबतीत, देशभरात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्यात, एअरफोर्सच्या विमानाने सिंगापूरहून ऑक्सिजन कंटेनर (oxygen) पानागढ येथे नेले. या ऑपरेशनसाठी भारतीय वायुसेनेची  C-17, C-130J, IL-76, An-32, Chinook आणि एमआय -17 हेलिकॉप्टर सहभागी झाले होते.



युनायटेड किंगडमकडून वैद्यकीय पुरवठा


याशिवाय मंगळवारी युनायटेड किंगडमभारकडून वैद्यकीय पुरवठा भारतात पोहोचला. हे विमान 100 व्हेंटिलेटर आणि 95 ऑक्सिजन केंद्रे घेऊन दिल्ली विमानतळावर पोहोचले.


देशभरात कोरोनाचा कहर


देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तरीही दररोज तीन लाखांहून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. भारतात गेल्या 24 तासांमध्ये 3,23,144 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूमुळे 2,700 पेक्षा जास्त रुग्ण मरण पावले. 


गेल्या 24 तासांत, देशभरात कोरोनामुळे 3,23,144  लोक त्रस्त झाले, तर  2,51,827 कोरोना बाधित ठणठणीत बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 2,771 लोक मरण पावले. एकट्या दिल्लीत गेल्या 24 तासात 380 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत एकूण 1,76,36,307 लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. यापैकी कोरोना पॉझिटिव्ह बनलेल्यांपैकी 1,45,56,209 आता कोरोना विषाणूवरमात करुन पूर्णपणे बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशभरात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 1,97,894 मृत्यू झाले आहेत. सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे 28,82,204 रुग्ण संक्रमित आहेत.