Union Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) या यावर्षी 1 फेब्रुवारी 2026 रोजी बजेट सादर करणार नाही अशी माहिती समोर आली आहे. मोदी सरकारने बजेट सादर करण्याची तारीख बदलण्या संदर्भात मोठा निर्णय घेतलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारी नाही तर 30 जानेवारी रोजी सादर केला जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय बजेट सादर केलं जाईल. सूत्रांच्या म्हणण्यानुसार 28 जानेवारी रोजी राष्ट्रपतींच अभिभाषण होईल, 29 जानेवारी रोजी इकोनॉमिक सर्वे होईल आणि 30 जानेवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाच्या संसदेत नवव्यांदा अर्थसंकल्प (Union Budget) सादर करतील.
सूत्रांच्या माहितीनुसार अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी नाही तर 30 जानेवारी 2026 रोजी शुक्रवारी हे बजेट सादर करतील. यासोबतच ते एक आणखीन रेकॉर्ड बनवतील. देशात असं पहिल्यांदाच होईल की अर्थमंत्री निर्मला सीतारमण 30 जानेवारीला बजेट सादर करतील. यापूर्वी 2017 पासून सुरु असलेल्या परंपरेनुसार देशाचं बेजट हे 1 फेब्रुवारीला सादर व्हायचं. अशी शक्यता वर्तवण्यात येतेय की यावेळी 1 फेब्रुवारीला रविवार येत असल्याने बजेट सादर करण्याच्या तारखेत बदल करण्यात आलाय. त्यामुळे बजेट हे 1 फेब्रुवारीनंतर नाही तर दोन दिवसांपूर्वी सादर केलं जाईल.
अर्थमंत्री निर्मला सीतारमणने पेपरलेस बजट सादर करून इतिहास रचला आणि नवी परंपरा सुरु केली. त्यांनी कोरोना पाहणारी दरम्यान 2021 च्या 1 फेब्रुवारी रोजी पेपरलेस बजेट सादर केलं. कोविड 19 महामारीमुळे, डिजिटल इंडिया उपयोगी पडला आणि कागदाचा वापर टाळण्यासाठी हे पेपरलेस अर्थसंकल्प एक ऐतिहासिक पाऊल होते. त्यानंतर अर्थमंत्री सीतारमण यांनी पारंपारिक कागदी अर्थसंकल्प (लेजर) ऐवजी मेड इन इंडिया टॅब्लेट वापरून संसदेत प्रथमच पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर प्रत्येक वर्षी निर्मला सीतारमण या पेपरलेस अर्थसंकल्प सादर करतात.
हेही वाचा : 2 दिवसांत सोनं 24600 रुपयांनी महागलं; मकर संक्रांतपूर्वी किंमत पुन्हा उच्चांकावर पोहोचणार? आताच जाणून घ्या!
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे एक अजून खास रेकॉर्ड आहे तो म्हणजे बजेटवरील सर्वात मोठ्या भाषेचा. त्यांनी 2020-21 मध्ये बजेट सादर करताना भारताच्या इतिहासातील अर्थसंकल्पावरील सर्वात लांब भाषण दिलं. त्यानंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी 2 तास 42 मिनिटे चाललेले अर्थसंकल्पीय भाषण दिले आणि 2019 मध्ये 2019-20 च्या अर्थसंकल्पीय भाषणाचा स्वतःचा विक्रम मोडला. 2019-20 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सीतारमण यांनी 2 तास 17 मिनिटे भाषण दिले.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.