'मी दुसऱ्याची प्रॉपर्टी, मला स्पर्श केलास तर...' लग्नाच्या पहिल्या रात्रीच हातात चाकू घेऊन नवरी, नवऱ्याने घेतला धसका!

Bride Extramarital Affair:  लग्नापूर्वी खूप आनंदी असलेल्या एका मुलाचे लग्नानंतर अचानक संपूर्ण आयुष्यच बदलले.

प्रविण दाभोळकर | Updated: Jun 24, 2025, 04:01 PM IST
'मी दुसऱ्याची प्रॉपर्टी, मला स्पर्श केलास तर...' लग्नाच्या पहिल्या रात्रीच हातात चाकू घेऊन नवरी, नवऱ्याने घेतला धसका!
नवरीची धमकी

Bride Extramarital Affair: संगम शहर प्रयागराजमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथे झालेल्या अरेंज्ड मॅरेजने सर्वांनाच धक्का दिलाय. लग्न झालेल्या मुलीचे नाव सितारा होते. हे लग्न दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरले होते. येथे कॅप्टन नावाच्या तरुणाचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. संपूर्ण वातावरण बँड-बाजा, मिरवणूक आणि पाहुण्यांनी गुंजले. इथपर्यंत सर्व काही सामान्य वाटत असले तरी लग्नानंतर पतीचे संपूर्ण आयुष्यच बदलले. काय घडलाय नेमका प्रकार? जाणून घेऊया. 

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लग्नापूर्वी खूप आनंदी असलेल्या एका मुलाचे लग्नानंतर अचानक संपूर्ण आयुष्यच बदलले. कप्तान नावाचा तरुण त्याच्या लग्नाने खूप आनंदी होता. कप्तानचे कुटुंब त्यांच्या सुनेला मोठ्या थाटामाटात घरी घेऊन आले पण दुसऱ्याच दिवशी अचानक सगळं बदलणार आहे हे त्यांना माहित नव्हते.

पतीला मारण्याची धमकी

लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणजेच मधुचंद्राच्या रात्री नवऱ्याला मोठा धक्का बसला. कारण सिताराने तिचा पती कप्तानला चाकूचा धाक दाखवला. जर मला स्पर्श केलास तर तुझे 35 तुकडे करेन. मी दुसऱ्या कोणाची तरी प्रॉपर्टी आहे, अशी धमकी सिताराने नवऱ्याला दिली. या धमकीने कप्तान इतका घाबरला की तो हनिमूनलाही गेला नाही. ही धमकी फक्त एकदाच देण्यात आली  असं नाही. तर तीन रात्रभर हाच खेळ सुरु होता. पीडित पती बायकोच्या दहशतीने आणि अपमानाने गुदमरत राहिला.

संपूर्ण कुटुंब पोलीस ठाण्यात

3 मे रोजी मुलाने घडलेला प्रकार त्याच्या आईला सांगितला. तेव्हा घरात गोंधळ सुरू झाला. त्यानंतर 'माझे प्रेमसंबंध आहेत, मला माझ्या प्रियकर अमनकडे पाठवा', असे सिताराने स्पष्टपणे सांगितले. यानंतर हे प्रकरण केवळ घरातच राहिले नाही तर पोलिस ठाण्यात पोहोचले. वधू मध्यरात्री घराच्या भिंतीवरून उडी मारून तिच्या प्रियकरासह पळून गेली. आता पतीसह संपूर्ण कुटुंब पोलिस ठाण्याच्या फेऱ्या मारतय.