ढगांवर तरंगणाऱ्या भारतातील सर्वात उंच चिनाब रेल्वेपुलावरुन धावणार वंदे भारत! स्वर्ग सुखाचा अनुभव देणारा रेल्वे प्रवास

Chenab Railway Bridge :काश्मीर खोऱ्याला देशाशी रेल्वेनं जोडणारा हा मार्ग आहे. स्थानिकांसाठी अनेक संधी यामुळे खुल्या होणार आहेत. आयफेल टॉवरपेक्षा उंच आणि इंद्रधनुष्यासारखी कमान असलेला हा पूल जगातलं एक आश्वर्य ठरणार आहे.

वनिता कांबळे | Updated: Nov 20, 2024, 10:57 PM IST
 ढगांवर तरंगणाऱ्या भारतातील सर्वात उंच चिनाब रेल्वेपुलावरुन धावणार वंदे भारत! स्वर्ग सुखाचा अनुभव देणारा रेल्वे प्रवास title=

Vande Bharat Express On Chenab Railway Bridge :  कुणी म्हणतं हे आश्चर्य आहे. कुणी म्हणतं हे अद्भूत आहे. कुणी म्हणतं अविश्वनीय आहे. कुणासाठी हे स्वप्नवत आहे. तर, कुणासाठी शेकडो किलोमीटरचा वळसा वाचवणारं आहे आणि अमाप संधी उघडणारा राजमार्ग आहे. यातून सगळ्या जगाला भारतीय इंजिनियर्सची अजोड बुद्धिमत्ता दिसलीये. भुगोल आणि विज्ञानाची सगळी सर्व आव्हानं झेलत हा अतिविशाल पूल उभारण्यात आला आहे.  पॅरीसचा आयफेल टॉवरही त्याच्यापुढे खुजा ठरेल. काश्मीरच्या अत्यंत दुर्गम चिनाब रेल्वे ब्रीज बांधण्यात आला आहे. लवकरच या ब्रीज वरुन वंदे भारत रेल्वे धावणार आहे.  स्वर्ग सुखाचा अनुभव देणारा असा हा रेल्वे प्रवास असले. 

काही महिन्यांपूर्वीच  या ब्रिजवरुन रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात आवी. त्याचाच भाग म्हणून या मार्गावर सांगलदान-रियासी लिंकची ट्रायल रन घेतली गेली. हा ब्रिज चिनाब नदीवर तब्बल 359 मीटर उंचीवर उभारण्यात आलाय. तर या ब्रिजची मुख्य कमान 467 मीटर इतकी आहे. आता लवकरच या पुलावरुन भारतातील सर्वात वेगवान रेल्वे अशी ओळख असलेली वंदे भारत ट्रेन धावणार आहे. 

2025 या वर्षात देशाची राजधानी दिल्ली आणि श्रीनगर दरम्यान  वंदे भारत ट्रेन  धावणार असल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीमध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) वर काश्मीर ते नवी दिल्ली जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत. चीन रेल्वे पुलावरुन ही वंदे भारत ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. 

पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटरहून जास्त याची उंची आहे. अतिवेगवान वारे, तसंच भूकंपरोधक अशी याची रचना आहे. आंतरराष्ट्रीय स्तराच्या वेल्डिंगचा यासाठी वापर करण्यात आलाय. या ब्रिजमुळे जम्मू काश्मीरची दळणवळण यंत्रणा आणकी भक्कम होणार आहे. पर्यटनालाही यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. तंसच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होणार आहे. तर सूरक्षा यंत्रणांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.