होणाऱ्या जावयाच्या प्रेमात पडली सासू; लेकीला कळल्यानंतर लेकीने जे केलं ते ऐकून...

Viral News : लेकीचं लग्न हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं. एका आईने आपल्या लेकीसाठी नवरा शोधला पण नंतर ती स्वत:चं जावयाच्या प्रेमात पडली. मुलीला ही घटना कळल्यानंतर तिने जे केलं ते...  

नेहा चौधरी | Updated: Jun 10, 2025, 02:30 PM IST
होणाऱ्या जावयाच्या प्रेमात पडली सासू; लेकीला कळल्यानंतर लेकीने जे केलं ते ऐकून...

Viral News : भारतात नातेसंबंधांना अतिशय महत्त्व आहे. लग्न आणि नवरा बायकोमधील नातं हे अतिशय पवित्र मानलं जातं. लेकीच्या जन्मापासूनच प्रत्येक पालक तिच्या लग्नाचे स्वप्न सजवत असतात. जशी मुलगी वयात ते तिच्या लग्नाचं वय होतं पालक तिच्यासाठी जोडीदार शोधतात. जगातील सर्वात चांगला जावई आपल्याला मिळावा असं त्यांना वाटतं असतं. तो आपल्या लेकीवर खूप प्रेम करेल तिला सुखी ठेवेल बस अशी त्यांची इच्छा असते. पण उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात लेकीसाठी निवडलेला नवरासोबत सासू पळून गेली आहे. 

उत्तर प्रदेशातील अलीगढमधील महिला जावयासोबत पळून गेलेली घटना ताजी असताना अजून एक तशीच घटना घडली आहे. बस्ती जिल्ह्यातील बंडा क्षेत्रात राहणाऱ्या महिलेच्या पतीचं 3 वर्षांपूर्वी निधन झालं होतं. तिला तीन मुलं आणि एक मुलगी आहे. अशात मुलीचे लग्नाच वय झालं म्हणून तिने नातेवाईकांना तिच्यासाठी मुलगा शोधायला सांगितला. 20 वर्षीय लेकीसाठी काही 23 वर्षीय शेतकरी तरुण जोडीदार म्हणून निवडण्यात आला. लग्नाची तारीख तेवढं ठरणं बाकी होतं, दोन्ही घरात सनईचौघड्याची तयारी सुरु झाली. अशात लेकीच्या आईचं लग्नाच्या तयारी निमित्त फोनवर बोलणं सुरु झालं. 

जावई लेकीपेक्षा आईशी तासंतास गप्पा मारत होता. लेकीच्याही काही गोष्टी लक्षात आल्यात मुलगी म्हणाली की, माझं लग्न ठरल्यानंतर आईचा स्वभावात बदल दिसत होता. आई अनेक वेळा लपून छपून फोनवर बोलताना तिला दिसून आली. ज्या तरुणाशी आईने लेकीचं लग्न ठरवलं तो गावात अनेक वेळा ये - जा करायचा. पण तो कधी तरुणीला भेटला नाही. त्यामुळे तिला शंका आली, काही तरी गडबड आहे. त्यानंतर तिने त्या तरुणावर नजर ठेवायचं ठरवलं. त्यानंतर आई जावयाशी तासंतास बोलत असल्याचं समोर आलं. त्यानंतर तिने तरुणाला फोन करुन विचारलं तर त्याने उडवाउडवीचे उत्तरं दिली. पण नंतर आईनेच कबुली दिली की, ती जावयाच्या प्रेमात आहे. 

ज्या तरुणाशी आईने लेकीचं लग्न ठरवं होतं, त्याचा प्रेमात सासू पडली होती. अशात लेकीने एक मोठा निर्णय घेतला. तिने समाजात बदनामी होऊ नको म्हणून तिने त्या दोघांचं लग्न लावून देण्याच ठरवलं. एका मंदिरात तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं लग्न आपल्या आईशी लावून दिलं.