गणिताचं हे कोडं सोडवण्यात भलेभले झाले फेल, पाहा तुम्हाला जमतंय का?

हे चॅलेंज तुम्ही घ्याच आणि या कोड्याच उत्तर सोडवा....पाहा व्हिडीओ

Updated: Sep 28, 2021, 10:59 PM IST
गणिताचं हे कोडं सोडवण्यात भलेभले झाले फेल, पाहा तुम्हाला जमतंय का?

मुंबई: तुम्हाला असं वाटत असेल की मला सगळं जमतंय तर मग हे चॅलेंज तुम्ही घ्याच कारण हे चॅलेंज भल्याभल्यांना जमलं नाही. सोशल मीडियावर एक कोडं सध्या व्हायरल होत आहे. हे कोड सोडवण्यासाठी इंजिनियर्सही फेल झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सध्या चर्चा सुरू आहे. या व्हिडीओमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न खूपच ट्रिकी आहे. मात्र त्याचं उत्तर काढण्यात अनेकांना अपयश आलं आहे. 

एकाने कागदावर एका खाली एक 100 असं दोनवेळा लिहिलं आहे. जर तुम्ही ते एका ओळीने दोनशे मध्ये बदलू शकाल, तर मी तुम्हाला पाहिजे ते सर्व देईन." असं या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलं आहे. अनेकांनी या कोड्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. एक लाईनने या शंभरला दोनशेमध्ये कसं बदलून दाखवाल या प्रश्नाचं उत्तर सर्वजण शोधत आहेत. 

एकाने पान उलटं करून पाहण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्याने 100 आकडा लिहून त्यावर आडवी रेष मारून 200 होतात का हे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशा एक नाही अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न केला आहे.एका सदस्याकडे पहिल्या "100" च्या "1" मध्ये एक छोटी ओळ काढली तो "टू" मध्ये बदलला. त्यामुळे तिथे TOO आणि 100 असं दिसू लागलं.

आता तुम्हाला या उत्तराव्यतिरिक्त जर दुसरं कोणत्या पद्धतीनं उत्तर काढता येत असेल तर नक्की सांगा. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 28,164 लोकांनी पाहिला आहे.

Tags: