मोलकरणीनं घेतला नवाकोरा 3BHK फ्लॅट; इंटेरिअरचा फोटो पाहून मालकीणही थक्क!

Viral News : 10 लाखांच्या कर्जात कसंकाय जमलं? नेटकरीसुद्धा हैराण... पाहा इंटरनेटवर व्हायरल झालेली आणखी एक कमाल पोस्ट...   

सायली पाटील | Updated: Oct 9, 2025, 03:00 PM IST
मोलकरणीनं घेतला नवाकोरा 3BHK फ्लॅट; इंटेरिअरचा फोटो पाहून मालकीणही थक्क!
viral video House Help Buys Rs 60 Lakh rupees flat internet goes crazy seeing the visuals

House Help Buys Rs 60 Lakh Flat: स्वत:चं आणि हक्काचं घर खरेदी करण्याचं प्रत्येकाचच स्वप्न असतं. याच स्वप्नाच्या बळावर माणसं मोठी होतात. किंबहुना काहीजण या स्वप्नासाठी प्रचंड मेहनतही घेतात. काहींना मात्र या स्वप्नासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते हेसुद्धा तितकंच खरं. स्वत:च्या घराविषयी इतक्या चर्चा होण्याचं कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारी एक पोस्ट. 

Add Zee News as a Preferred Source

नलिनी उनागर नावाच्या एका कंटेंट क्रिएटरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अशी बाब जगासमोर आणली आहे, ज्यामध्ये तिनं आपल्या घरातील मदतनीस महिलेनं 60 लाखांचा फ्लॅट खरेदी केल्याचं सांगितलं. आपण 'थक्क' होतो अशाच शब्दांत नलिनीनं पोस्टमध्ये आपला आनंद आणि भावना व्यक्त केल्या. 4 लाख रुपये घरातील फर्निचरवर खर्च करण्यात आले, तर या साऱ्यासाठी तिनं यासाठी कर्ज घेतलं होतं ते फक्त 10 लाखांचं. 

X युजरनं पोस्टमध्ये लिहिलं, 'आज आमची मदतनीस आनंदात होती. तिनं सांगितलं की, सूरतमध्ये 60 लाखांना 3BHK फ्लॅट खरेदी केला आणि फर्निचरसाठी 4 लाखांचा खर्च केला. कर्ज काढलं फक्त 10 लाखांचं. मी हैराणच झाले आणि विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की, वेळंजा गावात तिचं दुमजली घर असून, एक दुकानही आहे. दोन्ही भाडेतत्त्वावर दिले आहेत'. या पोस्टच्या शेवटी 'स्मार्ट बचतीची जादू...' असं नलिनीनं लिहिलं. 

नेटकऱ्यांना मिळाला चर्चेसाठी नवा विषय... 

एकिकडे काही नेटकऱ्यांनी मदतनीसाच्या जीवनात आलेला हा टप्पा किती महत्त्वाचं असल्याचं म्हणत आनंद व्यक्त केला, तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी सुरतमध्ये इतकं मोठं घर 60 लाखांना मिळतं का, हा प्रश्न उपस्थित केला आणि नव्या चर्चांना वाव मिळाला. काहींनी या पोस्टनं व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्याचंही म्हटलं. 

FAQ

ही व्हायरल घटना कोणत्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली?
कंटेंट क्रिएटर नलिनी उनागर यांच्या पोस्टमुळे ही घटना व्हायरल झाली आहे. त्यांनी 7 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या घरातील मदतनीस महिलेनं सूरतमध्ये 60 लाखांचा ३ BHK फ्लॅट खरेदी केल्याची आनंदाची बातमी शेअर केली आणि स्वत: 'थक्क' झाल्याचे सांगितले.

मदतनीस महिलेनं फ्लॅट कसा खरेदी केला?
महिलेनं सूरतमध्ये 60 लाख रुपयांचा 3 BHK फ्लॅट खरेदी केला. यासाठी फर्निचरवर 4 लाख रुपये खर्च केले आणि फक्त 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले. उरलेली रक्कम बचतीतून आणि इतर स्रोतांमधून आली. 

महिलेच्या गावात तिच्याकडे काय मालमत्ता आहे?
वेळंजा गावात तिच्याकडे दुमजली घर आणि एक दुकान आहे, जे दोन्ही भाडेतत्त्वावर दिले आहेत. या भाड्याच्या उत्पन्नामुळे तिची बचत वाढली आणि फ्लॅट खरेदी शक्य झाली, असे नलिनी यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More