)
सध्या रीलचा जमाना असून प्रत्येकजण आयुष्यातील छोटा मोठा क्षण मोबाईलमध्ये कैद करुन त्याचा रील करण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी अनेकजण धोकाही पत्करतात ज्यामुळे जीव जाण्याची शक्यता असते. अशाच प्रकारे रेल्वे ट्रॅकवर रील शूट करण्याच्या नादात एका 15 वर्षीय तरुणाने जीव गमावला आहे. ओडिशामधील पुरी येथे ही घटना घडली आहे. ट्रेनने धडक दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी जनकदेवपूर रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.
मंगलाघाट येथील रहिवासी विश्वजीत साहू याने त्याच्या आईसोबत दक्षिणकाली मंदिरात दर्शन घेतले. घरी परतत असताना छोटा व्हिडीओ शूट करण्यासाठी तो रेल्वे ट्रॅकजवळ थांबला होता.
A 15-year-old boy died after being hit by a train while he was filming a reel on a railway track in Odisha’s Puri.
— SK Chakraborty (@sanjoychakra) October 23, 2025
The incident occurred at the Janakdevpur railway station on Tuesday.
Vishwajeet Sahu, a resident of Mangalaghat, visited the Dakshinkali temple with his mother.
On… pic.twitter.com/tWouD4LQTM
या घटनेच्या मोबाईल व्हिडिओमध्ये साहू दुसऱ्या टोकाकडून ट्रेन येत असताना स्वतःचे रेकॉर्डिंग करत असल्याचं दिसत आहे. पण मागून वेगाने येणाऱ्या ट्रेनने त्याला धडक दिली, ज्यामुळे तो खाली कोसळला.
ऑगस्टमध्ये, गंजम जिल्ह्यातील बेरहमपूर येथील 22 वर्षीय युट्यूबर ओडिशातील कोरापूट येथील दुदुमा धबधब्यावर रील शूट करताना वाहून गेल्याने बेपत्ता झाला. सागर टुडू त्याचा मित्र अभिजित बेहेरा सोबत ड्रोन कॅमेरा वापरून त्याच्या युट्यूब चॅनेलसाठी स्थानिक पर्यटनस्थळांचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी त्या भागात जात होता.
लमतापुट परिसरात मुसळधार पावसानंतर माचकुंडा धरणाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडल्याने धबधब्यात पाण्याचा प्रवाह वाढला आणि ही दुर्घटना घडली. एका खडकावर उभ्या असलेल्या सागरचा तोल गेला आणि तो पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. पर्यटक आणि स्थानिकांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. माचकुंडा पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी शोध मोहीम सुरू केली परंतु तो सापडला नाही.