Honeymoonसाठी फुलांनी सजवलेला बेड पाहून नवरीला पडला प्रश्न, लोकं म्हणाले, "झोप महत्वाची बाबू"

आजकाल हनीमूनच्या निमित्ताने मित्र आणि नातेवाईक नवीन जोडप्याचा बेड फुलांनी सजवतात.

Updated: Jul 30, 2021, 08:38 PM IST
Honeymoonसाठी फुलांनी सजवलेला बेड पाहून नवरीला पडला प्रश्न, लोकं म्हणाले, "झोप महत्वाची बाबू"

मुंबई : लग्न हे फक्त नववधू आणि नवरदेवासाठीच महत्वाचे नसतात तर हे दोघांच्या घरच्यांसाठी देखील खूप महत्वाचे आहे. करण लग्नानंतर दोन्ही कुटुंब एकत्र येतात. त्यात लग्नानंतर एक महत्वाची गोष्ट असते, ते म्हणजे त्यांची लग्नानंतरची पहिली रात्र किंवा हनीमून. 

आजकाल हनीमूनच्या निमित्ताने मित्र आणि नातेवाईक नवीन जोडप्याचा बेड फुलांनी सजवतात. खोली सुंदर करतात जेणेकरून त्या जोडप्याला हे आवडेल. तसेच चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होईल जेणेकरुन नवीन जोडप्याला देखील चांगले वाटेल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील नववधूचे उत्तर पाहून तुम्हाला तिला काय म्हणावे असा विचार येईल.

ही नववधू जेव्हा तिच्या खोलीत जाते तेव्हा ती फुलांनी भरलेला बेड पाहाते. इतकी सुंदर खोली पाहून नववधू खूप खुश झाली. परंतु नंतर तिने निरागसपणे जो प्रश्न विचारला, तो पाहून लोकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

खरेतर खोली पाहून खूश झालेली नववधू तिच्या नवऱ्याला प्रश्न विचारते की, जर बेडवरती फुलं आहेत तर आपण झोपायचं कुठे? नवरीचा हा निरागसपणा पाहून लोकांनी या व्हिडीओला खूप पसंती दर्शवली आहे आणि खूप शेअर देखील केलं आहे.

व्हिडिओमध्ये दिसणारी ही वधू डॉ उपासना वोहरा आहे. विशेष म्हणजे ती अभिनेता विक्की कौशल आणि सनी कौशलची नातेवाईक आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युझरने कमेंट केली की - "झोप महत्वाची आहे बाबू".