Viral Video: कधी कधी उत्साहाच्या भरात आपण केलेली चूक आयुष्यभरासाठी धडा शिकवणारी ठरते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक जोडपं विश्रांती आणि प्रेमाच्या काही क्षणांसाठी हॉटेलमध्य गेलं होतं. पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर प्रायव्हसी विसरले आणि दरवाजा तसाच उघडा ठेवला. त्यामुळे झालं असं की, त्यांचे खासगीतील क्षण जवळच असणाऱ्या मेट्रो स्थानकाच्या फूटओव्हर ब्रीजवरुन लोक लाईव्ह पाहू लागले.
व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की, OYO हॉटेलमधील एका रुमचा बाल्कनीमधील दरवाजा उघडा होता. आतमध्ये एक प्रेमी जोडपं आपल्या खासगी क्षणांमध्ये गुंतलं होतं. या हॉटेलच्या अगदी समोर मेट्रो स्टेशन आहे. या मेट्रो स्थानकावरुन हॉटेलमधील सगळं काही स्पष्ट दिसत होते. अखेरीस एका तरुणाने स्थानकावरुनच त्यांना आवाज दिला आणि 'भाई दरवाजा बंद करुन घे' सांगितलं. आवाज ऐकताच जोडपं शुद्धीत आलं आणि त्यांनी दरवाजा बंद करुन घेतला.
मेट्रो स्थानकावरील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ इंस्टाग्रामला शेअर करण्यात आला आणि काही वेळातच तुफान व्हायरल झाला.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही त्यावर तुफान कमेंट्स करत आहेत. एका युजरने OYO चं ओपन थिएटर लिहिलं आहे. तर एकाने मेट्रोचं तिकीट घ्या आणि मोफत शो पाहा असं लिहिलं आहे. एका युजरने मस्करीत लिहिलं आहे की, 'आता OYO वाल्यांनी रुममध्ये दरवाजा बंद करुन घ्या असा बोर्डही लावायला हवा असं म्हटलं आहे'.