टेक्नोलॉजीपेक्षा बायको स्मार्ट, एक साधी ट्रिक आणि नवऱ्याला असं पकडलं रंगेहाथ

जरी पती कोणतेही काम गुपचूप करत असेल, तरी पत्नीची नजर नेहमीच त्याच्यावर असते.

Updated: Oct 6, 2021, 03:52 PM IST
टेक्नोलॉजीपेक्षा बायको स्मार्ट, एक साधी ट्रिक आणि नवऱ्याला असं पकडलं रंगेहाथ

मुंबई : सोशल मीडियावरती आपल्याला अशा अनेक गोष्टी पाहायला मिळताता जे पाहून आपले मनोरंजन होते, तर काही गोष्टीमुळे आपल्याला शिकायला देखील मिळते, परंतु सोशल मीडियावर आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळताता ज्या आपल्या खऱ्या आयुष्याशी मिळते जुळते असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. जे पाहून आपल्याला खूप हसायला देखील येते. जसे की, पती आपल्या जोडीदारापासून अनेक गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना हे माहित नसते की पत्नीला त्यांच्या या पराक्रमाची पूरेपूर जाणीव असते.

जरी पती कोणतेही काम गुपचूप करत असेल, तरी पत्नीची नजर नेहमीच त्याच्यावर असते. अशा परिस्थितीत जर पती पकडला गेला, तर ती परिस्थिती काही वेगळीच असते. अशा वेळी त्या पतीचं काय होईल याचा कोणीही विचार करु शकत नाही. या गोष्टीला आपण आता जरी हसण्यावारी घेत असलो तरी, त्या नवऱ्यालाच त्याची परिस्थिती माहित.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये असेच काहीसे दिसून आले, त्यामध्ये नवरा मोबाइलमध्ये मुलींचे फोटो बायकोच्या समोर चोरुन पाहत होता.

नवऱ्याला बायकोला मूर्ख बनवायचे होते

बहुतेक नवरा-बायको घरात एकत्र वेळ घालवतात. त्यामुळे त्यांना एकमेकांचे स्वभाव चांगलेच माहित झालेले असतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये, तुम्ही पाहू शकता की नवरा सोफ्यावर बसलेला आहे, तर त्याची बायको सुद्धा त्याच सोफ्यावरती उलटी झोपलेली आहे.

बायकोचा पाय नवऱ्याच्या खांद्याच्या पुढे ठेवला आहे. नवरा मोबाईल चालवत आहे आणि बायकोला सगळ्याच बायकांसारखा आपल्या नवऱ्यावर संशय आहे. ज्यामुळे मग बायको आपल्या पायात आरसा अडकवते आणि आपला नवरा मोबाइलमध्ये काय काय पाहात आहे यावर लक्ष ठेवते. त्यावेळी तिला कळते की, आपला नवरा फोनमध्ये मुलींचे फोटो पाहात आहे.

त्यानंतर बायकोने आपल्या नवऱ्याला विचारले की, तुम्ही मोबाईलमध्ये नक्की काय पाहात आहात, तेव्हा लगेच नवऱ्याने मोबाईलवरील फोटोबदलला आणि कुत्र्याचा फोटो दाखवला. हे पाहून बायकोला खूप राग आला आणि तिने पतीला पायने लाथ मारली. नवऱ्याला बायकोची लाथ लागताच त्याचा चेहरा पाहण्यासारखा होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही सेकंदांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. यामूर आणि ओकान नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला गेला. ज्यावर लोकांनी भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.