नैनीताल : सध्या लखनऊमधील एका महिलेने कॅब ड्रायव्हरला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावेळेला नक्की चुक कोणाची आणि काय झालं होतं हे काही कोणाला कळायला मार्ग नव्हता. परंतु त्यानंतर या घटनेच्या काही वेळापूर्वीचा व्हिडीओ सर्वांच्या समोर आला ज्यामुळे लोकांना यात नक्की कोणाची चुकी होती हे समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचप्रमाणे आता सोशल मीडियावर दुसरा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला पोलिसांशी गैरवर्तन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ उत्तराखंडच्या नैनीतालचा आहे, जिथे पर्यटनासाठी आलेल्या एका महिलेने लेडी एसआयसोबत (Woman tried to scuffled with Woman SI) भांडण केले. यासह, महिला आणि तिच्या इतर पोलिस साथीदारांनी त्यांचे गणवेश उतरवण्याची धमकी देत आहेत.



वास्तविक, पोलीस नैनीतालच्या तल्लीतमध्ये नियमित तपासणी करत होते आणि या दरम्यान हिमाचलच्या नंबरची एक कार तिथे पोहोचली, ज्याच्या काचेवर काळी फिल्म होती म्हणजेच त्या गाडीच्या काचा काळा रंगाच्या होत्या. परंतु RTO नियमांनुसार गाडीला काळ्या रंगाच्या काचा लावण्याची परवानगी लोकांना नाही, त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक (एसआय) राजकुमारी सिंघानिया यांनी त्यांना थांबवले आणि त्या काळा रंगाच्या पट्टीला हटवण्यासाठी सांगितले. परंतु यानंतर कारचालक संतापला आणि त्या कारमधील सगळेच त्या महिला पोलिस कर्मचाऱ्याशी भांडू लागले.


या दरम्यान, कारमध्ये उपस्थित असलेल्या एका महिलेने, पोलिसांना शिवीगाळ करण्याव्यतिरिक्त, हाणामारी देखील केली. चौकात मध्यभागी जोरदार गोंधळ घातला. त्यानंतर गाडीत बसलेल्या पर्यटकांनी पोलिसांना अहंकार दाखवत त्यांना पैसे देऊन निघून जाण्याचीही चर्चा केली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी घटनेचा व्हिडीओ बनवला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


कारमधील महिलेचा गैरवर्तन इतका वाढला की, तिने आधी महिला निरीक्षकाला धमकी दिली आणि म्हणाली की, "तुझी या कारचे चालान कापण्याची लायकी नाही" यासह तिने पोलिसांचा गणवेश काढून टाकण्याची धमकीही दिली. ती महिला पुढे म्हणाली की, तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर मला सांगा परंतु तुम्ही कारला काही करु शकत नाही.


रस्त्यावर गोंधळ वाढत असल्याचे पाहून स्थानिक लोक मदतीला आले. यावर या पर्यटकांनी स्थानिक लोकांची इज्जत काढली आणि म्हणाले की, "तुमची दोन पैशाची लायकी नाही, तुमच्यासारखे लोकं आमच्याकडे घरी धूणी-भांडी करतात." यानंतर मात्र स्थानिक लोक संतप्त झाले. हे प्रकरण वाढताना पाहून पोलिसांनी कसे बसे अतिरिक्त फौज मागवून त्यांच्यावर नियंत्रण मिळवले आणि या पर्यटकांची 6 कोटीची कार जप्त केली.


पोलीस स्टेशन निरिक्षक विजय मेहता यांनी सांगितले की, दिल्लीतील वसंत विहार येथील रहिवासी शिवम मिश्रा, विवेक आणि संदीप, तसेच कानपूर येथील रहिवासी स्मिता यांच्यावर शिवीगाळ करणे, सरकारी कर्मचाऱ्याला धमकावणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर आईपीसी कलम 504, 506, 353, 186 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.