Reading Dyslexic Student: आपण अनेकांना अभ्यासापासून लांब पळताना पाहतो. याचं मोठं प्रमाण लहान जास्त पाहायला मिळतं. काही लहान मुलांची शैक्षणिक अभ्यासातील गोडीइतरांच्या तुलनेत कमी पाहायला मिळते. काही मुलं पुस्तकांना पाहताच लांब पळतात, तर काही चक्क घाबरतात. अनेकजण दररोज अभ्यास करतानाही ते कचरताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका आजाराविषयी सांगणार आहोत ज्यामुळे काही लहान मुलं इतरांच्या तुलनेत अभ्यासात मागे पडल्याचं पाहायला मिळतात. या बातमीत आम्ही विशेष करुन जी मुलं गणित या विषयाला जास्त घाबरतात अशा आजाराविषयी सांगणार आहोत. त्या आजाराला मॅथ्स डिस्लेक्सिया (Maths dyslexia) असे म्हणतात. (Weak In Maths Due to this disease children find maths difficult NZ)
नेमकं मॅथ्स डिस्लेक्सिया म्हणजे काय?
मॅथ्स डिस्लेक्सिया (Maths dyslexia) यावर झालेल्या रिसर्चनुसार हा आजार अनुवंशिक असल्याचं समजतं. याव्यतिरिक्त काही मुलं कमी वयात गणित या विषयास कठीण समजतात आणि तो समज डोक्यात घेऊन बसतात आणि अशामुळे ते गणित या विषयापासून लांब पळु लागतात. कालांतराने त्याच्या मनात गणित या विषयासाठी भीती निर्माण होते. या भीतीचे रुपांतर आजारात होते. त्यामुळेच मुलांना गणित विषयातील कॉन्सेप्ट समजायला कठीण जाते.
या आजाराची लक्षणे काय आहेत?
मॅथ्स डिस्लेक्सिया आजार खूप लोकांमध्ये पाहायला मिळतो. गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी यासारखे लहान प्रश्न सोडवता येत नाहीत. अशावेळेस त्या मुलांचे लक्ष वर्गात नसतं. हा आजार असलेली मुलांना अंक मोजतानाही त्रास होतो किंवा ते गोधंळतात. याव्यतिरिक्त त्यांना अंक ओळखण्यास ही स्पष्टता मिळत नाही..
जाणून घ्या उपचार
मॅथ्स डिस्लेक्सिया हा एक मेंदूचा आजार आहे. यासाठी अजून कोणताही उपचार सांगितला गेला नाही. एक्सपर्ट सांगतात की मुलांनी मेंदूला ताण न देता नियमित गणित या विषयाचा अभ्यास केला, तर त्यांचा आजारात हळूहळू सुधारणा होते. याप्रकारे या आजारावर मात करता येऊ शकते.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)