Viral Video: कमळाने केला घात, मंगलाष्टक सुरु असतानाच लागली आग; पुढे झालं ते फारच धक्कादायक!

Wedding Viral Video:  लग्नांमध्ये जास्त दिखाऊपणा केल्याबद्दल लोक सोशल मीडियावर लोकांना ट्रोल करतात. 

प्रविण दाभोळकर | Updated: May 22, 2025, 02:44 PM IST
Viral Video: कमळाने केला घात, मंगलाष्टक सुरु असतानाच लागली आग; पुढे झालं ते फारच धक्कादायक!
लग्नाचा व्हिडीओ

Wedding Viral Video: आज काल लग्न अविस्मरणीय करण्याचा ट्रेण्ड आहे. त्यासाठी लोकं लाखो रुपये मोजायला तयार असतात. आग, पाण्याशी खेळ करत वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जातात. पण योग्य ती काळजी न घेतल्याने यात अनेकदा फसगत होऊन लग्न सोहळ्याला गालबोट लागण्याचीदेखील शक्यता असते. असे प्रकार वारंवार घडत असतात पण लोकं त्यातून काही धडा घेताना दिसत नाहीत. अशाच एका धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ समोर आलाय.  

लग्नात पैशांचा चुराडा

आता लग्न पूर्वीसारखे साध्या पद्धतीने होत नाहीत. लग्नात वधूच्या प्रवेशापासून ते हारांच्या देवाणघेवाणीपर्यंत आणि वधू-वरांच्या नृत्यापर्यंत सर्व काही खास असते. लग्नांमध्ये जास्त दिखाऊपणा केल्याबद्दल लोक सोशल मीडियावर लोकांना ट्रोल करतात. अशा प्रकारे पैशांचा चुराडा केला जात असल्याची टीकादेखील केली जाते. बऱ्याचदा लग्नसमारंभात लोकांच्या विचित्र गोष्टी चांगल्याच महागात पडतात. बऱ्याचदा लग्न समारंभात जीवघेणे अपघातही होतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओ पाहिल्यानंतर असं करण्याची काय गरज होती? असं लोकं विचारतायत.

वराचा प्रवेश आणि मोठा गोंधळ 

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाच्याही अंगावर काटा येईल. लग्न सर्वांच्या कायमचं लक्षात रहावं यासाठी वधू-वराने खास प्लानिंक केलं होतं. लग्नाचा मंडप खास पद्धतीने सजवण्यात आला होता. मंडपाला भलं मोठं कमळाचं डिझाइन करण्यात आलं होतं. हे कमळ कापडापासून बनवण्यात आलं होतं. लग्न लागताच कमळ फुलणार होतं. पण प्रत्यक्षात त्याच्या उलटच झालं. 

 जोडप्याला वाचवण्यासाठी गर्दी 

खरंतर वधू-वरांची एन्ट्री संस्मरणीय बनवण्यासाठी कापडापासून बनवलेले कमळ बनवण्यात आले होते. वधू आणि वर आत होते आणि हारांच्या देवाणघेवाणीची तयारी सुरू होती. आता कमळ खुलणार असे सर्वांना वाटले. पण कमळ फुलण्याआधीच त्याला आग लागली. नको तेच घडलं. सर्वांनी आरडाओरड सुरु केली. काय करावं कोणालाच सुचतं नव्हतं. साऱ्यांचं लक्ष जोडप्याकडे गेलं. जोडप्याला वाचवण्यासाठी गर्दी जमली. लोकांनी कापडाचे कमळ उघडले आणि नंतर त्या जोडप्याला सुरक्षित बाहेर काढले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ravi Arya (@ravi_arya_88)

लोकं विचारतायत प्रश्न

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित करतायत. लग्नात असे धोके पत्करु नयेत, अशी प्रतिक्रिया एकाने दिलीया. तर तुम्ही असे फालतू नाटक का करता? असा प्रश्न दुसऱ्या एका युजरने विचारला. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ravi_arya_88 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय.