मुंबई 26/11 सारखा हल्ला करण्याचा कट उघड?

10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 12, 2025, 09:46 PM IST
मुंबई 26/11 सारखा हल्ला करण्याचा कट उघड?

ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : दिल्ली स्फोटाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आलीय. मुंबईतील 26/11 सारखे दहशतवादी हल्ले करण्याचा प्लान आखण्यात आला होता.. दिल्लीतील अनेक महत्त्वांची ठिकाणी टार्गेट करण्यात आली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, कडक सुरक्षेमुळे हल्ला करण्याचा प्लॅन फसल्याची माहिती देखील मिळत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

दिल्लीमध्ये लाल किल्ला परिसरामध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर तपासाची चक्र वेगानं फिरली आहेत. या प्रकरणात आतापर्यत अनेक जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दिल्ली स्फोटाच्या तपासात आता एक धक्कादायक माहिती समोर आलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत झालेल्या 26/11 सारखा हल्ला करण्याचा कट करण्यात आल्याचं उघड झालंय, लाल किल्ला, इंडिया गेट, रेल्वे स्थानकं तसंच अयोध्येतील राम मंदिर देखील या लोकांच्या टार्गेटवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर लाल किल्ला, इंडिया गेट, कॉन्स्टिट्यूशन क्लब, गौरी शंकर मंदिर, प्रमुख रेल्वे स्थानकं आणि शॉपिंग मॉल्स टार्गेट करण्याचा प्लॅन होता. जानेवारी 2025 पासून याबाबतचा कट रचला जात असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे. दहशतवादी मॉड्यूल अनेक महिन्यांपासून 26/11 च्या मुंबई हल्ल्यांसारखेच मोठे हल्ले करण्याची योजना आखत होते.

धार्मिक स्थळांना लक्ष्य करून जातीय तणाव निर्माण करण्याचाही कट आखल्याची माहिती मिळाली आहे. काश्मीरमधील पुलवामा, शोपियान आणि अनंतनाग येथील काही कट्टरपंथी डॉक्टरांनी त्यांच्या "व्हाइट-कॉलर"  कव्हरचा फायदा घेतला. आणि त्यानंतर फरिदाबादमध्ये त्यांनी त्यांचा तळ स्थापन केला. डॉक्टर असल्यानं त्यांना संशय येण्याची शक्यता कमी होती आणि ते एनसीआरमध्ये सहजपणे फिरू शकत होते.

लाल किल्ल्यावर हल्ला करण्याचा प्लॅन उमर नवी आणि मुजम्मील शकील यांनी आखला होता. जानेवारीच्या सुरूवातीला या दोघांनी लाल किल्ल्याची देखील रेकी केली होती. प्रजासत्ताक दिनी तसंच दिवाळीच्या वेळी हल्ला करण्याचा प्लॅन आखण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.  मात्र, चोख सुरक्षेमुळे ते हल्ला करू शकले नाहीत.

अटकेत असलेल्या काही संशयित आरोपींकडून एनआयएनं काही वस्तू जप्त केल्या आहेत. आरोपी डॉ. परवेजकडून 3 की-पॅड मोबाईल जप्त तसंच एक हार्ड डिस्क देखील हस्तगत करण्यात आली आहे. परवेजवर दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचा ठपका, एनआयकडून कसून चौकशी सुरू आहे. तसंच दहशतवादी शाहीनचा शोबा-ए-दावत कोड डिकोड करण्यात आला आहे. जन्नतच्या नावावर शाहीन महिला आणि तरुणींची माथी भडकावण्याचा प्रयत्न करायची अशी माहिती महिला आणि तरुणींना दहशतवादी बनवण्याचं प्रशिक्षण शाहीन देत असल्याचं समोर आल आहे. 

मुंबईत झालेल्या 26/11च्या हल्ल्यानंतर फक्त मुंबईच नव्हे तर संपूर्ण देश हादरला होता. मात्र, या आरोपींचा देखील दिल्लीत अशाच पद्धतीचा हल्ला करण्याचा प्लॅन होता. एनआयएकडून सुरू असलेल्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अॅक्शन मोडवर आल्या आहेत.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More