पाकिस्तानचा कर्दनकाळ ठरणार भारताचं S-400 ; शत्रूला थेट मृत्यूच्या दाढेत ढकलते ही प्रणाली

Operation Sindoor Latest Update :पाकिस्तानवर एअरस्ट्राईक केल्यानंतर भारताची आणखी एक चाल. दहशतवादाला समूळ ठेचण्यासाठी उललं मोठं पाऊल

सायली पाटील | Updated: May 7, 2025, 10:10 AM IST
पाकिस्तानचा कर्दनकाळ ठरणार भारताचं S-400 ; शत्रूला थेट मृत्यूच्या दाढेत ढकलते ही प्रणाली
OPERATION SINDOOR

What is India S 400 Air Defence Systems: पहलगाम (Pahalgam terror attack) हल्ल्याची परतफेड करण्यासाठी म्हणून भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर लाँच केलं आणि याचअंतर्गत पाकिस्तानातील जवळपास 9 दहशतवादी तळांवर भारतीय लष्करानं क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवलाय एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार भारतीय लष्कर आणि वायुदलानं संयुक्तरित्या चालवलेल्या या मोहिमेमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला.

रात्रीच्या अंधारातच पाकिस्तानमधील या दहशतवाद्यांना कायमस्वरुपी गाढ झोपेत पाठवणाऱ्या भारताच्या या लष्करी कारवाईनंतर आता पाकिस्तानमधून भारताच्या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. शस्त्रसंधीचं सातत्यानं होणारं उल्लंघन असो किंवा मत भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न असो, भारताला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानमध्येही कुरापती सुरू असल्याचं वृत्त समोर आलं आहे. याच धर्तीवर सावधगिरी म्हणून भारतानं जगातील सर्वात घातक अशी एअर डिफेन्स सिस्टीम अर्थात हवाई सुरक्षा प्रणाली सक्रिय केली आहे. S 600 प्रणाली सुरू केल्यानं आता हीच प्रणाली पाकिस्तानचा कर्दनकाळ ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे.

भारताचं सुरक्षा कवच आहे एस 400

भारतीय सैन्यदलातील एस-400 मिसाइल सिस्टीम ही देशातील सर्वात सक्षम अशी वायू प्रणाली मानली जातत आहे. भारतावर हवाई मार्गावर होणारा किंवा होऊ पाहणारा कोणताही हल्ला परतवून लावण्याची ताकद या प्रणालीमध्ये आहे. 2018 मध्ये भारतानं रशियाकडून 5 अब्ज डॉलर इतक्या खर्चामध्ये एस 400 या एअर डिफेन्स सिस्टीमसाठी करार केला होता. 

मारक क्षमता विश्वासही बसणार नाही इतकी दमदार... 

जगातील सर्वात घातक एअर डिफेन्स सिस्टीम म्हणून ओळखला जाणाऱ्या एस 400 या मिसाईल सिस्टीमला भारतानं चीन आणि पाकिस्तानचे मनसुबे लक्षात घेऊन तैनात केलं आहे. या प्रणालीच्या माध्यमातून 40 ते 400 किमी पर्यंत लक्ष्यभेद करण्याची क्षमता आहे. अमेरिकेच्या F-35 या लढाऊ विमानावरही निशाणा साधता येईल इतकी ही प्रणाली कमाल असल्याचं सांगण्यात येतं.