What is K M Navanati Crime Story: प्रेम, अनैतिक संबंध, पतीला अफेअरचा संशय आला आणि निर्घृण हत्या. चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशी घटना मुंबईत घडली होती. 1960 च्या दशकात घटलेल्या या घटनेने फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण भारतात एकच मोठी खळबळ उडाली होती. के. एम नानावटी प्रकरण हे तेव्हा भारतात चांगलंच गाजलं होतं. या प्रकरणामुळं न्याय व्यवस्थेत बदल करण्यात आले. काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊया.
27 एप्रिल 1959 रोजी मुंबईतील एका मोठ्या सोसायटीत नौदल अधिकारी मानेकशॉ नानावटी यांनी त्यांच्याकडे असलेल्या पिस्तूलने व्यवसायिक प्रेम अहुजा याच्यावर गोळ्या चालवल्या. तीन मिनिटांच्या आत तीन गोळ्या चालवल्या. हे प्रकरण भारतीय न्याय व्यवस्थेच्या इतिहासातील सर्वात चर्चिले गेलेले प्रकरण ठरले आहे.
के.एम. नानावटी त्यांची पत्नी सिल्विया आणि तीन मुलांसह मुंबईत राहत होते. तर प्रेम अहुजा त्यांचे मित्र होते. सिल्विया आणि प्रेम यांच्यात संबंध निर्माण झाले. स्वतः सिल्विया यांनीच नानावटी यांना याबाबत सांगितले. के. एम नानावटी यांनी कोर्टात सांगितले की, ते अहुजाच्या घरी गेले आणि त्यांनी त्याला थेट विचारलं की सिल्वियासोबत लग्न करणार का? तेव्हा अहुजाने त्यांना नकार दिला त्यानंतर नानावटी यांनी अहुजावर गोळ्या चालवल्या.
एका रिपोर्टनुसार, घटनेच्या संध्याकाळी साधारण 5 वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिस खात्यातील उप कमिश्नर जॉन लोबो यांना कमांडर सॅम्युअल यांचा फोन आला होता. कमांडर सॅम्युअल यांनी लोबो यांना सांगितले की नानावटी त्यांना भेटण्यासाठी येत आहे. नानावटी यांनी लोबो यांना जावून सांगितलं की त्यांनी एका व्यक्तीवर गोळी झाडली आहे.
27 एप्रिल 1959 रोजी नानावटी यांना प्रेम अहुजा यांच्या हत्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. नानावटी यांच्यावर 302 आणि ज्यूरी ट्रायलअंतर्गंत खटला दाखल करण्यात आला होता. नानवटी यांच्या केसची सुनावणी सुरू झाली आणि नॅशनल हिरो म्हणून त्यांना कोर्टात नेण्यात आले. 23 सप्टेंबर 1959 रोजी ट्रायल कोर्ट ज्युरीने 8-1 से नानावटी यांना निर्दोष असल्याचे सांगत मुक्तता करण्यात आली.
न्यायमूर्तींनी हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले. 11 मार्च 1960 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नानावटी यांना हत्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. मात्र काही तासांतच तेव्हाचे बॉम्बेचे गव्हर्नरने हाय कोर्टाचे आदेश फेटाळले. त्यानंतर नानावटी केस सर्वोच्च न्यायलयात पोहोचली. 5 सप्टेंबर 1960 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवली. 8 सप्टेंबर1960 रोजी के. एम नानावटी यांना नौसेना जेलमधून आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली. ऑक्टोबर 1963 मध्ये तब्येत ढासळल्याने त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले आणि एका बंगल्यात ठेवण्यात आले. 16 मार्च 1964 साली महाराष्ट्राचे गव्हर्नर विजय लक्ष्मी पंडित यांनी शिक्षा माफ केली. नानावटी 3 वर्षांची शिक्षा भोगून आल्यानंतर ते पत्नी आणि मुलांसह कायमचे कॅनडात स्थायिक झाले.
नानावटी केसमुळं संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला. नानावटी देशातील असं पहिलं प्रकरण होतं ज्यात नागरिकांना मिडीया ट्रायल पाहिलं. एका मासिकाने तर खुलेआम नानावटी यांना समर्थन दिलं होतं. त्यामुळं ते नागरिकांच्या नजरेत हिरो ठरले होते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा नानावटी कोर्टात जात तेव्हा मुली त्यांच्यावर फुलांची बरसात करायच्या. महिला लिपस्टकचे निशाण लावून नोटांची बरसात करायच्या.