PM SVANidhi Yojana : छोट्या व्यावसायिकांना शासनाकडून मोठी मदत, मिळवा 90 हजार रुपयांपर्यंत कर्ज!

PM SVANidhi Yojana: देशात अनेक शासकीय योजना सुरू करण्यात येतात ज्यांचा उद्देश विविध घटकांना आर्थिक मदत देणे हा असतो. त्यापैकीच एक आहे ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना (PM SVANidhi Yojana), ही योजना केंद्र शासनाने खास छोट्या व्यावसायिकांसाठी आणि फेरीवाल्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 90 हजार रुपयांपर्यंत कर्ज कोणत्याही हमीशिवाय दिले जाते.

Updated: Oct 8, 2025, 04:27 PM IST
PM SVANidhi Yojana : छोट्या व्यावसायिकांना शासनाकडून मोठी मदत, मिळवा 90 हजार रुपयांपर्यंत कर्ज!

PM SVANidhi Yojana: ही योजना जून 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती. कोरोनाच्या काळात अनेक छोट्या व्यापार्‍यांचे व्यवसाय बंद पडले, उत्पन्नाचे साधन थांबले. अशा लोकांना पुन्हा उभे राहण्यासाठी शासनाने ही योजना आणली असून ही आजही कार्यरत आहे. या योजनेतील खास बाब म्हणजे एकदा कर्जाची परतफेड केल्यानंतर, लाभार्थीला दुसऱ्यांदा कर्जाच्या स्वरूपात कोणत्याही व्याजदराशिवाय दुप्पट रक्कम मिळू शकते. त्याशिवाय घेतलेल्या कर्जाची रक्कम एका वर्षाच्या कालावधीत फेडता येते

Add Zee News as a Preferred Source

कोणाकोणाला मिळतो योजनेचा लाभ?

या योजनेचा फायदा  हातगाडीवाले, छोटे व्यापारी, रेल्वेमध्ये वस्तू विकणाररी लोक घेऊ शकतात. मात्र मोठ्या व्यावसायिकांना या योजनेचा लाभ मिळत नाही. 

किती मिळू शकते रक्कम?

सुरुवातीला या योजनेत 80 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळत होते, मात्र आता ही मर्यादा वाढवून 90 हजार रुपये करण्यात आली आहे. कर्ज तीन टप्प्यांत दिले जाते 

  •  पहिला टप्पा – 15 हजार रुपये
  •  दुसरा टप्पा – 25 हजार रुपये
  •  तिसरा टप्पा – 50 हजार रुपये

अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. त्यासाठी अधिकृत वेबसाइट https://pmsvanidhi.mohua.gov.in वर जाऊन लॉगिन करून फॉर्म भरावा लागतो. तसेच नजीकच्या कॉमन सर्विस सेंटरवर (सीएससी) जाऊन ऑफलाइन अर्ज देखील करता येतो.

इतकी सोपी आहे फॉर्म भरण्याची पद्धत

  1. होमपेजवर जाऊन Apply Loan 10k/Apply Loan 20k/Apply Loan 50k वर क्लिक करा.
  2. या ठिकाणी तुमचा मोबाइल नंबर नोंदवा, तुमच्या मोबाइलवर SMSच्या माध्यमातून एक OTP येईल.
  3. OTP पडताळणी झाल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म समोर येईल.
  4. यानंतर संपूर्ण फॉर्म भरा, सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. पडताळणीनंतर स्वनिधी योजनेंतर्ग कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल.

आवश्यक कागदपत्र आणि पुरावे 

  • ओळखीचा पुरावा 
  • विक्री पुरावा, जसे की स्ट्रीट व्हेंडर प्रमाणपत्र किंवा शिफारस पत्र
  • कर्ज वितरणासाठी बँक खात्याचा तपशील
  • भारतीय नागरिक असणे आवश्यक 

शासनाची ही योजना छोट्या व्यावसायिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे, कारण यातून त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची नवी संधी मिळते.

FAQ

1. ही योजना अजून कार्यरत आहे का?

होय, ही योजना आजही कार्यरत आहे आणि छोट्या व्यापाऱ्यांना लाभ देत आहे.

2. कोणाला योजनेचा लाभ मिळतो?

हातगाडीवाले, छोटे व्यापारी, रेल्वेत वस्तू विकणारे यांना लाभ मिळतो. मोठ्या व्यावसायिकांना याचा लाभ मिळत नाही.

3. कर्जाची परतफेड कशी करावी?

कर्ज एका वर्षात परत करता येते. पहिल्या कर्जाची परतफेड केल्यास दुसऱ्या कर्जाची रक्कम दुप्पट आणि व्याजमुक्त मिळू शकते.

 

About the Author