'S.E.X' वाल्या स्कुटीमुळे मुलीला बाहेर पडणं मुश्किल, वडिलांकडून मिळालेलं गिफ्ट

काय आहे 'S.E.X' वाली स्कुटी?

Updated: Nov 30, 2021, 01:11 PM IST
'S.E.X' वाल्या स्कुटीमुळे मुलीला बाहेर पडणं मुश्किल, वडिलांकडून मिळालेलं गिफ्ट

नवी दिल्ली : प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की कॉलेजला जाताना मस्त स्कुटी घेवून जावं. एका मुलीचं स्वप्न पूर्ण देखील झालं पण त्या मुलीसाठी तिची नवी स्कुटी धोक्याची घंटा ठरली. जेव्ही ही मुलगी स्कुटी घेवून घरातून बाहेर पडायची तेव्हा तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. पण नक्की त्या स्कुटीमध्ये  नक्की असं काय आहे ज्यामुळे तिला एवढ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. 

ही व्यथा आहे दिल्लीतील एका सर्वसामान्य मुलीची. मागच्या महिन्यात त्या मुलीचा वाढदिवस होता, तिने वडिलांकडे वाढदिवसाची भेट म्हणून स्कुटी मागितली. मुलगी कॉलेजला जाणार म्हणून वडिलांनी स्कुटी घेवून दिली. पण आता स्कुटीच्या नंबरप्लेटवरून त्रास सुरू झाला. 

स्कुटीला आरटीओकडून मिळालेला नंबरच्या मध्यभागी S.E.X असे अल्फाबेट होते. गाडीवर नंबर प्लेट लावायला गेलेल्या मुलीच्या भावाला हे तीन शब्द आपल्या कुटुंबाच्या अडचणी वाढवणार आहेत याची कल्पनाही नव्हती. कारण स्कुटीच्या नंबर प्लेटवर S.E.X लिहिले होते. 

तिच्या भावाने घरी सर्व परिस्थिती सांगितली. यासंदर्भात दिल्लीच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, जवळपास दहा हजार वाहनांना या सीरिजचा नंबर देण्यात आला आहे. त्यामुळे यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही.

दिल्ली परिवहन आयुक्त दहिया यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की- 'एकदा वाहनांना नंबर दिला की, तो बदलण्याची सध्याची तरतूद नाही कारण ही सर्व प्रक्रिया एका सेट पॅटर्नवर चालते..... त्यामुळे आता त्यामुलीला स्कुटी बाहेर कशी घेवून जाता येणार आसा मोठा प्रश्न आहे.