जगन्नाथ मंदिरातील तिसऱ्या पायरीवर कोणीच ठेवत नाही पाय; पुजारीही करतात सक्त मनाई; दडलंय मोठं रहस्य

Jagannath Temple Secret: जगन्नाथ मंदिरातील तिसऱ्या पायरीचं नेमकं रहस्य काय आहे आणि त्यावर पाय ठेवण्यास मनाई का केली जाते?   

शिवराज यादव | Updated: Jun 13, 2025, 04:12 PM IST
जगन्नाथ मंदिरातील तिसऱ्या पायरीवर कोणीच ठेवत नाही पाय; पुजारीही करतात सक्त मनाई; दडलंय मोठं रहस्य

Jagannath Temple Secret: भारतामध्ये मंदिर हे फक्त आस्था आणि श्रद्धेचं केंद्र नाही तर रहस्य आणि चमत्कारांनी भरलेलं आहे. ओडिशामधील जगन्नाथ मंदिर हे असंच एक अद्भुत ठिकाण आहे, ज्याचं केवळ धार्मिक महत्त्व नाही. हे मंदिर रहस्यांनी भरलेलं आहे. असंच एक रहस्य मंदिराच्या तिसऱ्या पायरीबद्दल आहे. या पायरीशी संबंधित गोष्ट ना फक्त भक्तांसाठी आस्थेचा विषय आहे, तर अनेक उत्सुकताही निर्माण करणारी आहे. कारण या पायरीवर पाय ठेवण्यास मनाई आहे. 

काय आहे जगन्नाथ मंदिराच्या तिसऱ्या पायरीचं रहस्य?

पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश केल्यानंतर तिसरी पायरीवर 'यमशिला' स्थित आहे. यावर यमराज विराजमान आहेत अशी मान्यत आहे. कथेनुसार, जेव्हा भक्त भगवान जगन्नाथाचं दर्शन करतात तेव्हा ते पापातून मुक्त होऊन मोक्ष मिळवतात. यामुळे यमलोकात जाणाऱ्यांची संख्या कमी झाली होती. यमराज यांनी आपली समस्या भगवान जगन्नाथ यांना सांगितली होती.

भगवान जगन्नाथ यांनी यमराजांना आश्वासन दिलं की, मंदिरातील तिसऱ्या पायरीवर त्यांनी स्थानि दिलं जाईल. तसंच जर एखाद्या भक्ताने दर्शन करुन परतताना या पायरीवर पाय ठेवला तर सर्व पुण्य नकोसे होतील आणि यमलोक जावं लागेल. तेव्हापासूनच या पायरीवर पाय ठेवण्यास सक्त मनाई करण्यात आली अशी मान्यता आहे. 

कशी दिसते यमशिला?

जगन्नाथ मंदिरात एकूण 22 पायऱ्या आहेत. यामधील तिसऱ्या रंगाची पायरी इतर पायऱ्यांपेक्षा वेगळी म्हणजे काळ्या रंगाची आहे. याच विशेष रंगामुळे तिला सहजपणे ओळखू शकतो. भक्तांना दर्शन करुन झाल्यानतर परतताना या पायरीवर पाय देऊ नका असं सांगितलं जातं. ही पायरी प्रवेशद्वारातून खालच्या बाजूला किसऱ्या क्रमावर येते. हे स्थान यमराज यांच्या उपस्थितीचं प्रतिक आहे. भक्त फार श्रद्धेने याकडे पाहतात.