कोणत्या नोटेवर नसते RBI गव्हर्नरची सही?

Reserve Bank of India Governor Never Signs this Note : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची का नसते या नोटेवर कधीच सही? जाणून घ्या कारण...

दिक्षा पाटील | Updated: Dec 11, 2024, 12:46 PM IST
कोणत्या नोटेवर नसते RBI गव्हर्नरची सही? title=
(Photo Credit : Social Media)

Reserve Bank of India Governor Never Signs this Note : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी आता संजय मल्होत्रा यांची निवड करण्यात आली आहे. आज म्हणजेच 11 डिसेंबर पासून पुढील तीन वर्षांसाठी ते RBI चे गव्हर्नर असणार आहेत. संजय मल्होत्रा हे आधी कॅबिनेटच्या महसूल सचिव पदी होते. आता ते RBI चे गव्हर्नर झाले असून त्यांनी आता हा कार्यभाळ सांभाळला आहे. यामुळे आता यापुढे आपल्या सगळ्यांच्या नोटांवर संजय मल्होत्रा यांची सही पाहायला मिळणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का? तर आपल्या सगळ्या नोटांवर RBI चे जे कोणी त्या काळात गव्हर्नर असतात त्यांचीच सही असते. पण तुम्हाला माहितीये का की एक अशी नोट आहे ज्यावर त्यांची सही नसते. चला तर आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. 

RBI ज्या कोणत्याही नोट किंवा चलन जारी करतात तेव्हा त्या नोटांवर गव्हर्नरची सही असते. त्यावर गव्हर्नरची सही असेल तरच ती नोट ही व्हॅलिडेट असल्याचं मानलं जातं. दोन रुपये किंवा त्या पेक्षा जास्त रक्कमचेच्या नोटेवर RBI गव्हर्नरची सही असते. पण त्यातही भारतातील एक नोट आहे ज्यावर RBI गव्हर्नरची सही नसते. आता तुम्हाला इतकं वाचल्यानंतर थोडा अंदाज आला असेल. तर ही नोट 1 रुपयांची आहे. 1 रुपयांच्या नोटेवर कधीच RBI गव्हर्नरची सही नसते. त्या मागचं एक खास कारण आहे. 

काय आहे 1 रुपयाच्या नोटेवर RBI गव्हर्नरची सही नसण्याचं कारण?

देशात एक रुपयांची नोट ही अर्थ मंत्रालय जारी करते. त्यामुळे या नोटेवर RBI गव्हर्नरची नाही तर वित्त सचिवाची सही असते. त्यामुळेच 1 रुपयांच्या नोटेवर RBI ऐवजी गव्हर्मेंट ऑफ इंडिया (Goverment Of India) असं लिहिलेलं असतं. कोणत्याही नोटेवर सही असणं हे महत्त्वाचं आहे. कारण जर सही नसेल तर ती नोट ही वैध्य समजली जात नाही.

हेही वाचा : दिलीप कुमार , सायरा बानो यांच्या नशीबी कधीच का नाही आलं पालकत्वं? 'त्या' घटनेविषयी त्यांनीच केला होता खुलासा

देशात एक रुपयाची नोट सगळ्यात पहिल्याद 30 नोव्हेंबर 1917 मध्ये जारी करण्यात आली. दरम्यान, 1994 मध्ये या नोटा येणं बंद झालं होतं. आजही लग्न समारंभात शकुनाचा 1 रुपया देण्यासाठी ही नोट देतात. तर काही लोकं ही नोट आठवण म्हणून सांभाळून ठेवतात.