Bank Locker Rules : आरबीआयकडून भारतातील बँकांना लॉकर ठेवण्याची व्यवस्था देण्यात आली आहे. बँक ही कुठलही आहे, तिची व्याप्ती किती आहे, यावर त्या बँकेला लॉकरची संख्या दिली जाते. सर्वसाधारण लोकांना माहिती आहे, लॉकरमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि मौलवान वस्तू, दागिने ठेवले जातात. पण त्याशिवाय या लॉकरमध्ये काय काय ठेवता येतं तसंच त्या कुठल्या गोष्टी ठेवता येत नाही याविषयी जाणून घेणार आहोत. अजून एक प्रश्न सर्वसामान्यांना पडतो तो म्हणजे बँकेमध्ये लॉकर हे कोणाला मिळतं.
बँक लॉकर ही ज्वेलरी आवश्यक कागदपत्र आणि वैध सामान सुरक्षित ठेवण्यासाठी वापरलं जातं. तर बँकेत लॉकर हे कोणीही घेऊ शकतं. तुम्हाला जर लॉकर उघडायचा असेल तर लॉकर अर्ज करण्यासाठी संबंधित बँकेत तुमचं सेव्हिंग अकाऊंट असावं लागतं. सेव्हिंग अकाऊंट नसेल तर ते आधी उघडावे लागतं. यासाठी तुम्हाला पॅन किंवा आधार कार्ड याची आवश्यकता लागते. त्यासोबत बँकेसोबत स्टँप पेपरवर एग्रीमेंट करण्यात येतं. (Who can use a locker in a bank What things can be kept and what not What if something goes missing from a bank locker Rbi Rules )
बँक लॉकर फक्त ग्राहकांना ही एक्सेस मिळतो. ग्राहकांशिवाय नातेवाईकांना लॉकर उघता येत नाही.
बँक लॉकर उघडताना ग्राहक आणि बँकेचा एक अधिकारी तिथे असतो.
तसंच बँक लॉकरची चाबी ग्राहकांनी हरवल्यास बँक जबाबदार नसते.
लॉकरच्या नुकसानीसाठी बँक जबाबदार आहे.
जर लॉकरमध्ये ठेवा सामान चोरीला केल्यास बँक आपली भरपाई देतं.