Maithili Thakur News : (Bihar Assembly Election 2025) बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भातील तारखा, निकालाचा दिवस आणि मतदारांची संख्या यासंदर्भातील सविस्तर माहिती नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगानं एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केली. इथं निवडणुकीच्या तारखा जाहीर व्हायच्या आधीपासूनच काही नावं सातत्यानं प्रकाशझोतात येताना दिसली. त्यापैकीच एक नाव म्हणजे, बिहारमधील लोकसंगीतासह शास्त्रीय संगीत आणि युट्यूब जगतामध्ये चर्चेच असणाऱ्या मैथिली ठाकूरची.
2025 च्या बिहार निवडणुकीमध्ये मैथिली ठाकूरसुद्धा शर्यतीत दिसणार असल्याच्या चर्चा कैक स्तरांमध्ये पाहायला मिळत आहेत. भाजप नेता नित्यानंद राय आणि विनोद तावडे यांच्यासोबतच्या मुलाखतीमुळं मैथिलीचं नाव अधिकच प्रकाशझोतात आलं होतं. राहता राहिला प्रश्न मैथिलीच्या ओळखीचा, तर मैथिली ठाकूर कोण? आणि तिची नेमकी ओळख काय? हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
वयाच्या अतिशय कमी टप्प्यावरच मैथिली प्रसिद्धीझोतात आली होती. 2020 च्या प्रामुख्यानं कोरोना काळापासून ती युट्यूबवर चर्चेत आली. अभंग आणि काही गायनाच्या व्हायरल व्हिडीओंनी तिचं लक्ष वेधलं आणि पाहता पाहता मैथिली जागतिक स्तरावर प्रसिद्धीझोतात येताना दिसली. 17 व्या वर्षीच कमाल प्रसिद्धी मिळवणाऱ्या मैथिलीनं अतिशय गायन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली.
2024 मध्ये बिहारच्या या लोकप्रिय गायिकेवर अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवत तिला बिहार राज्य खादी ग्रामोद्योग बोर्डानं 'ब्रँड अॅम्बेसेडर'पदी निवडलं. यापूर्वी मैथिलीला संगीत नाटक अकादमीकडून प्रतिष्ठीत असा उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कारानंही गौरवण्यात आलं होतं.
फार कमी वयात मैथिली ठाकूरनं प्रसिद्धी मिळवली असून तिचा जन्म 25 जुलै 2000 मध्ये झाला. ती मुळची बिहारच्या मधुबनी येथील बेनीपट्टी जिल्ह्यातील असून, बालपणापासूनच तिच्यावर गीत- संगीताचे संस्कार झाले आणि याच वातावरणात ती रमली. मैथिलीचे वडील रमेश ठाकूर एक संगीतकार असून, तिची आई पूजा ठाकूर गृहिणी आहे. मैथिलीला एक मोठा भाऊ असून त्याचं नाव आहे ऋषभ ठाकूर. तर, तिच्या धाकट्या भावाचं नाव आहे अयाची. भारतीय शास्त्रीय संगीताशिवाय लोकगीतांना सुरांची साथ देऊन सादर करण्यावर मैथिलीची पकड असून, तिला ही दैवी देणगी आजोबा आणि वडिलांकडून मिळाली.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या या मैथिलीनं आजवर अनेक जाहीर कार्यक्रमांमध्ये तिली कला सादर केली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देवेंद्र फडणवीस, संजय राऊत यांसारख्या मातब्बर नेतेमंडळींसमोरही तिनं आपली कला सादर केली असून या प्रत्येकाचीच दाद मिळवली आहे. तेव्हा आता कलाक्षेत्रात सहगत्या वावरणारी ही मैथिली राजकारणाच्या मैदानात सक्रिय होते का आणि तसं झाल्यास एक युवा महिला नेता म्हणून तिची कारकिर्द नेमकी कशी असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मैथिली ठाकूर कोण आहे आणि तिचा जन्म कधी-कुठे झाला?
मैथिली ठाकूर ही बिहारची प्रसिद्ध लोकगायिका आणि शास्त्रीय गायिका आहे. तिचा जन्म 25 जुलै 2000 रोजी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी येथे झाला. तिचे वडील रमेश ठाकूर संगीतकार आहेत
मैथिली ठाकूरची गायन कारकिर्द कशी सुरू झाली आणि तिची ओळख काय?
मैथिलीने बालपणापासून संगीताचे संस्कार घेतले आणि 17 व्या वर्षीच प्रसिद्धी मिळवली. 2020 च्या कोविड काळात यूट्यूबवर अभंग आणि लोकगीतांच्या व्हायरल व्हिडिओंमुळे ती जागतिक स्तरावर चर्चेत आली.
बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये मैथिली ठाकूर उतरतेय का?
होय, चर्चा आहे की मैथिली बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उतरेल. तिने भाजप नेते विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्याशी बैठक केली असून, मधुबनी किंवा दरभंगा (विशेषतः बेनीपट्टी) मतदारसंघातून राजकीय पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.