GK : विमानं फक्त पांढऱ्या रंगाचीच का असतात? कारण जाणून शॉक व्हाल

विमानं फक्त पांढऱ्या रंगाचीच का असतात? जाणून घेऊया यामागचे वैज्ञानिक कारण

वनिता कांबळे | Updated: Apr 21, 2025, 11:47 PM IST
GK : विमानं फक्त पांढऱ्या रंगाचीच का असतात? कारण जाणून शॉक व्हाल

Why Are Airplanes Always White: आकाशात उंच झेप घेणाऱ्या विमानांचे लहानांपासून सर्वांनाच मोठे आकर्षण वाटते. आकाशात उडणारी बहुतेक विमाने पांढऱ्या रंगाची असतात. विमान कोणत्याही एअरलाइनचे असो, विमानाचा बाह्य भाग सहसा पांढरा दिसतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की विमानं फक्त पांढऱ्या रंगाचीच का असतात? जाणून घेऊया यामागचे कारण. 

विमानांना पांढरा रंग देण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सुरक्षा. पांढरा रंग हा सुरक्षिततेसाठी सर्वोत्तम रंग आहे. पांढरा रंग दुरून अगदी स्पष्टपणे दिसतो, ज्यामुळे इतर विमाने किंवा हवाई वाहतूक नियंत्रणाला ते ओळखणे सोपे होते. यामुळे आकाशात विमानांची टक्कर होण्याचा धोका कमी होतो. यामुळे उड्डाण करणे अधिक सुरक्षित होते.

पांढरा रंग सूर्यकिरणांना परत परावर्तित करतो. पाढऱ्या रंगामुळे विमानातील तापमान जास्त वाढत नाही. विशेषतः लांब पल्ल्याच्या विमानांमध्ये, ही सुविधा प्रवाशांना आरामदायी प्रवास प्रदान करण्यास मदत करते. तसेच आणि वातानुकूलन प्रणालीवरील दबाव कमी करते.

गडद रंग जास्त उष्णता शोषून घेतात, म्हणजेच विमान थंड ठेवण्यासाठी जास्त ऊर्जा वापरली जाते, त्यामुळे इंधनाची बचत होते. तर पांढरा रंग तापमान संतुलित ठेवतो आणि इंधनाचा वापर देखील कमी करतो. याचा अर्थ असा की हा रंग विमान कंपन्यांना दीर्घकाळात खर्च वाचविण्यास देखील मदत होते.

पांढऱ्या रंगावर लहान ओरखडे, भेगा किंवा कोणत्याही प्रकारची घाण दिसून येते, जेणेकरून ते वेळेवर दुरुस्त करता येते. यामुळे विमानाची सुरक्षितता सुनिश्चित होते आणि उड्डाणांमध्ये विलंब होत नाही. गडद रंगांना वारंवार रंगवावे लागतात.  तर पांढरा रंग जास्त काळ टिकतो. यामुळे रंगकाम आणि देखभालीचा खर्चही कमी होतो, जो कोणत्याही विमान कंपनीसाठी फाद्याची बाब आहे. पांढरा रंग एअरलाइन्ससाठी एक उत्तम कॅनव्हास म्हणून काम करतो. यामुळे विमान कंपन्या त्यांचे लोगो, नाव त्यावर ठळकपणे लिहू शकतात.