मुंबई : अटल बिहारी वाजपेयी यांना विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ते सहज देत असते. अनेकदा तर त्यांनी उत्तर दिल्यानंतर विषयच बदलून जात असे. तर गंभीर विषयाचं देखील ते अतिशय हलक फुलकं उत्तर देत असे. वाजपेयी यांच्या जवळचे आनंद अवस्थी सांगतात, अटल वाजपेयी हे दोन्ही कलांमध्ये निपुण होते. अगदी कठीण आणि टाळण्यासारख्या प्रश्नाचं उत्तर देखील ते अगदी सहज हल्क्या - फुल्क्या स्वरूपात देत असे. तर कधी कधी अगदी मस्करीत ते सहज गंभीर गोष्ट बोलून जात असे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक प्रसंग माजी आरएसएसचे प्रसारक संतोष मिश्र यांनी सांगितलं की, अटल वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ते चित्रकूटमध्ये नाना देशमुख यांनी सुरू केलेल्या ग्राम विकास कार्यक्रम बघायला आले होते. तेव्हा पाचवी इयत्तेत असलेल्या एका आदिवासी मुलीने त्यांना विचारलं की, आपण लग्न का नाही केलं?


तेव्हा अटल वाजपेयी जोरात हसले. आणि त्या मुलीला उत्तर दिलं, की कुणी मिळालीच नाही. त्यांच्या अशा बोलण्याने तिथे एकच हसा फुटला. वाजपेयी यांना लहान मुलांची खूप आवड. ते कधीही कुणाच्या घरी गेले आणि तेथे लहान मुलं असेल तर ते त्यांच्याशी अगदी मोकळेपणाने गप्पा मारत असे.