31000000000000 रुपयांची सोने खरेदी... एकही सोन्याची खाण नसलेल्या देशाकडून भारतात का आलं एवढं सोनं?

India Gold Reserves: सोन्याचा सर्वाधिक साठा असलेल्या टॉप 10 देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या, तर चीन सहाव्या क्रमांकावर आहे. भारत कितव्या स्थानी आहे जाणून घ्या...

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 13, 2025, 09:21 AM IST
31000000000000 रुपयांची सोने खरेदी... एकही सोन्याची खाण नसलेल्या देशाकडून भारतात का आलं एवढं सोनं?
सर्वाधिक सोनं असलेल्या देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानी? (प्रातिनिधिक फोटो, मूळ फोटो सौजन्य - रॉयटर्स)

India Gold Reserves: अमेरिका आणि युरोपियन देशांच्या बरोबरीत येण्यासाठी चीनकडून जास्तीत जास्त सोने खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोने खरेदी करण्याची जागतिक पातळीवर स्पर्धा सुरू असून, सोन्याचा दर रॉकेटच्या वेगाने वाढत आहे. सोन्याचा सर्वाधिक साठा असलेल्या टॉप 10 देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या, तर चीन सहाव्या क्रमांकावर आहे. या यादीत भारताचे स्थान नववे आहे. भारताने सर्वाधिक सोने स्वित्झर्लंडकडून खरेदी केले आहे, ही उल्लेखनीय बाब आहे.

Add Zee News as a Preferred Source

भारताने किती सोनं खरेदी केलं?

अर्थ मंत्रालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारताने 2015 ते 2024 या दहा वर्षाच्या काळात 25 पेक्षा जास्त देशांकडून तब्बल 31 लाख कोटी (3,72,386 मिलियन डॉलर) रुपयांच्या सोन्याची खरेदी केली आहे. विशेष म्हणजे मागील 10 वर्षांमध्ये सोन्याची तस्करी करणाऱ्यांपासून 31 हजार 772 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. 

चीनचा डोळा सोन्यावर का आहे?

चीन सोन्याचा जास्तीत जास्त साठा करण्याचा प्रयत्न करत आहे. 2024 मध्ये सोन्याचे सर्वाधिक (380 टन) उत्पादन चीनमध्ये झाले आहे. यानंतरही सोने खरेदीत चीन आघाडीवर आहे. 2023 मध्ये चीनजवळ 1948 टन सोन्याचा साठा होता. 2024 मध्ये तो 2264 टन झाला आहे. चीन मौल्यवान खनिज संपत्ती ताब्यात घेत आहे. आता चीनचा डोळा सोन्यावर आहे.

नक्की वाचा >> सोनं 3 लाख 10 हजार रुपये प्रति तोळा... Gold Rate मोडणार सगळे विक्रम; कारण अन् तारीखही समोर

सोने खरेदी कोण करतेय?

सोन्याचे दर गगनाला भिडले असले, तरी सोन्याची सर्वाधिक खरेदी दागिन्यांसाठी केली जात आहे. यानंतर विविध देशांच्या राष्ट्रीय बँका, ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड), बिस्किटे आणि नाण्यांच्या रूपात सोन्याची खरेदी होत आहे.

स्वित्झर्लंडकडून सोने खरेदी सर्वाधिक का करतो भारत?

भारताने सर्वाधिक एक लाख 68 हजार 651 मिलियन डॉलरचे सोने स्वित्झर्लंडकडून खरेदी केले आहे. स्वित्झर्लंडमध्ये सोन्याच्या खाणी नाहीत; परंतु सर्वात मोठी रिफायनरी येथे आहे. विशेष म्हणजे स्वित्झर्लंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रापेक्षाही 7.5 पट लहान आहे.  

भारताने कोणाकडून किती सोनं घेतलं?

स्वित्झर्लंडनंतर संयुक्त अरब अमिराती (48,206 मिलियन डॉलर), साऊथ आफ्रिका (25,785 मिलियन डॉलर), पेरू (18,644 मिलियन डॉलर), घाना (17,041 मिलियन डॉलर), अमेरिका (16900 मिलियन डॉलर) आणि ऑस्ट्रेलिया (10492 मिलियन डॉलर) चा समावेश आहे.

सीमा शुल्कामधून फायदा

सोन्याची आयात केल्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणावर सीमा शुल्क प्राप्त झाले आहे. या दहा वर्षाच्या काळात 144140 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. सोन्याचे सर्वाधिक भांडार असलेल्या दहा देशांच्या यादीत भारत सध्या नवव्या क्रमांकावर आहे.

2024 मध्ये सोन्याचे उत्पादन (टन)

380 चीन
330 रशिया
284 ऑस्ट्रेलिया
202 कॅनडा
158 अमेरिका
(वर्ल्ड गोल्ड काउन्सिलनुसार)

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More