25 डिसेंबर 2025 पर्यंत 20,000,000 भारतीयांची नोकरी जाणार? अमेरिकेच्या एका निर्णयामुळे आयटी, बँकिंग आणि मीडिया सेक्टरमध्ये खळबळ माजणार

मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे संस्थापक सौरभ मुखर्जी यांनी इशारा दिला की, २० दशलक्ष भारतीय नोकऱ्या धोक्यात आहेत. जर ट्रम्प प्रशासनाने भारतावरील कर कमी केले नाही तर त्याचे परिणाम विनाशकारी होतील.

वनिता कांबळे | Updated: Nov 15, 2025, 07:47 PM IST
25 डिसेंबर 2025 पर्यंत 20,000,000 भारतीयांची नोकरी जाणार? अमेरिकेच्या एका निर्णयामुळे आयटी, बँकिंग आणि मीडिया सेक्टरमध्ये खळबळ माजणार

America Policy Effect On Indian Job :अमेरिकेत घडकत असललेल्या भयानक घडामोडीचा परिणाम भारतीय नोकरदारवर्गावर होत आहे. अमेरिकेच्या एका निर्णयामुळे खळबळ माजणार आहे. 20,000,000 भारतीयांना नोकरी गमवाली लागणार आहे.  भारतातील मध्यमवर्गीय नोकऱ्या मंदीमुळे नव्हे तर इतर विविध कारणांमुळे गंभीर संकटाचा सामना करत आहेत. मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे संस्थापक सौरभ मुखर्जी यांनी गंभीर इशारा दिला आहे. जर धोरणकर्त्यांनी त्वरित कारवाई केली नाही तर त्याचे परिणाम विनाशकारी असू शकतात. 

Add Zee News as a Preferred Source

नोकऱ्या गेल्या हे मंदीमुळे नसून कॉर्पोरेट ऑपरेशन्स, एआय आणि जागतिक व्यवसाय परिस्थितीमुळे आहेत. अलिकडच्या एका पॉडकास्टमध्ये, मुखर्जी यांनी भारतातील व्हाईट कॉलर जॉब मार्केटमध्ये सुरू असलेल्या अशांततेबाबत भाष्य केले. "आपण जॉब मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ पाहत आहोत. आयटी, बँकिंग आणि मीडिया सारख्या मानक मध्यमवर्गीय नोकऱ्यांची जागा गिग जॉब्स घेतील." भारताला त्याचा पूर्णपणे अनुभव घेण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतील. या काळात, पगारदार नोकऱ्यांचा एक महत्त्वाचा भाग नाहीसा होऊ शकतो. त्यानंतर भारत एक प्रमुख गिग अर्थव्यवस्था बनेल. ते फक्त राइडशेअर आणि अन्न वितरणापुरते मर्यादित राहणार नाही.  सर्वजण या गिग अर्थव्यवस्थेचा भाग असतील. 

हे संकट आर्थिक मंदीचा परिणाम नाही. तर, कंपन्या खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी एआयचा अवलंब करत असल्याने आहे.  अनेकांच्या नोकऱ्या AI मुळे गेल्या आहेत. अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात AI चा वापर सुरु केला आहे.  पोर्टफोलिओमधील बँका, मीडिया सेक्टर तसेत  किंवा चीनच्या पोर्टफोलिओमधील आयटी सर्व्हिस कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात AI चा वापर सुरु केला आहे. जाहिराती देखील एआय-आधारित झाल्या आहेत. जाहिरातीत दाखवलेले मॉडेल देखील एआय आहे. जाहिरातीत दाखवलेला पोपट देखील खरा नाही.

मुखर्जी यांच्या मते, गृहकर्ज वगळता, भारतीय घरगुती कर्ज हे उत्पन्नाच्या 33-34 टक्के आहे, जे जगात सर्वाधिक आहे. अर्थव्यवस्था कर्जाच्या ओझाने दबलेली आहे. इतके कर्ज आहे की ते परतफेड करण्यास वेळ लागेल.  अमेरिकेसोबतच्या व्यापार तणावाकडे पाहिले असता जर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शुल्क मागे घेतले नाही तर ख्रिसमसपर्यंत सुमारे 2 कोटी भारतीय नोकऱ्या जाऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला. दरवर्षी 2 ते 5 लाख रुपये कमावणाऱ्या लोकांच्या नोकऱ्या जात आहेत आणि दशकांपासून निर्यात फ्रँचायझी उभारणाऱ्या कंपन्यांना शिक्षा होत आहे हे अत्यंत दुःखद आहे. ते पुढे म्हणाले की, भारत सरकार आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात लवकरच मुक्त व्यापार करार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More