)
yoga music and computers in the syllabus: नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत भारतीय शिक्षण व्यवस्थेत महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. योगा, संगीत असे विषय विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी उपयुक्त असतात. आता अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमात योग, संगीत आणि संगणक विषयांचा समावेश होणार आहे. कोणी घेतलाय हा ऐतिहासिक निर्णय? सविस्तर जाणून घेऊया.
गुजरात सरकारने शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण पाऊल उचलत अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात व्यावसायिक विषयांचा समावेश करण्याचा निर्णय घेतलाय. हा बदल शैक्षणिक सत्र 2026-27 पासून अकरावीत आणि 2027-28 पासून बारावीत लागू होणार आहे. विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणासोबत कौशल्य-आधारित ज्ञान मिळावे, हा या निर्णयाचा उद्देश आहे.
गुजरात शिक्षण विभागाने सामान्य प्रवाहातील गट 4 अंतर्गत योग, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण, ललित कला, संगीत, संगणक अभ्यास आणि इतर व्यावसायिक विषयांचा पर्यायी विषय म्हणून समावेश केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे विषय निवडण्याची संधी मिळणार आहे.
हा निर्णय राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेण्यात आला आहे. NEP मधील माध्यमिक स्तरावर व्यावसायिक शिक्षणाच्या एकीकरणावर भर देणाऱ्या धोरणाला पाठबळ देण्यासाठी हा उपक्रम आहे.
मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे पाऊल महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया आदिवासी विकास आणि शिक्षणमंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी दिली.
हे विषय पर्यायी स्वरूपात उपलब्ध असतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या रुची आणि भविष्यातील करिअरच्या दृष्टिकोनातून योग्य विषय निवडता येतील. यामुळे शिक्षण अधिक लवचिक आणि विद्यार्थीकेंद्रित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (GSHSEB) सर्व संलग्न शाळांना 2025-26 सत्रासाठी वार्षिक तपासणी अहवाल 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अहवाल सादर करण्यासाठी शाळा त्यांचा निर्देशांक क्रमांक आणि पासवर्ड वापरू शकतात, यासंबंधी माहिती gseb.org किंवा ir.gseb.org वर उपलब्ध आहे.हा निर्णय विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी आणि शिक्षणाला व्यावहारिक बनवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असे म्हटले जात आहे.
उत्तर: गुजरात शिक्षण विभागाने सामान्य प्रवाहातील गट 4 अंतर्गत योग, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण, ललित कला, संगीत, संगणक अभ्यास आणि इतर व्यावसायिक विषयांचा पर्यायी विषय म्हणून समावेश केला आहे. हे विषय शैक्षणिक सत्र 2026-27 पासून अकरावीत आणि 2027-28 पासून बारावीत लागू होतील.
उत्तर: या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पारंपारिक शैक्षणिक ज्ञानासोबत व्यावहारिक आणि कौशल्य-आधारित शिक्षण प्रदान करणे आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या मार्गदर्शनानुसार, हे विषय विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी आणि करिअरच्या दृष्टिकोनातून योग्य शिक्षण निवडण्यास मदत करतील.
उत्तर: गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (GSHSEB) सर्व संलग्न शाळांना 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी वार्षिक तपासणी अहवाल 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाइन सादर करण्यास सांगितले आहे. शाळा त्यांचा निर्देशांक क्रमांक आणि पासवर्ड वापरून gseb.org किंवा ir.gseb.org या संकेतस्थळांवर अहवाल सादर करू शकतात.