नवी दिल्ली :  उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने मदरशांना एक फर्मान सोडले आहे. 
  याआधी १५ ऑगस्टला  मदरशांमध्ये तिरंगा फडविण्याचे आदेश दिले गेले होते. तसचे स्वातंत्र्यदिनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ शुटिंगही करण्यास सांगितले होते. सरकारच्या या आदेशाचा मुस्लीम संघटनांकडून विरोधही झाला होता.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार आमच्यावर शंका घेत आहे असेही काही मुस्लिम बांधवांनी यावेळी सांगितले. हे प्रकरण निवळेपर्यंत सरकारने नवे फर्मान सोडले आहे.


  या नव्या आदेशानुसार उत्तर प्रदेशमध्ये असणाऱ्या सर्व मदरशांना ऑनलाईन केले जाणार आहे. मदरशांमध्ये होणारे गोंधळ रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. 


 यामुळे मदरशांमधील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासही मदत होणार आहे. मदरशांमधील व्यवस्था पारदर्शी चालण्यास मदत होणार आहे. पोर्टल लॉंच झाल्यावर वेगवेगळ्या प्रश्नांचे ऑनलाईन निराकरण करण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला उत्तर प्रदेशमध्ये ६७२५ मान्यताप्राप्त मदरसे आहेत. 


 ऑनलाईन पोर्टलवर मदरशांचे फोटोही अपलोड केले जाणार आहे. याव्यतिरिक्त शिक्षकांचे पद, तसेच रिक्त पदांची माहितीही उपलब्ध होणार आहे. अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्यांच्या खात्यात दिले जाणार आहे.