नवी दिल्ली :  झी एन्टरटेन्मेंट एंटरप्राइजेज लिमीटेड (ZEEL)ने Zee5 अॅप लॉन्च केले आहे. हे देशातील सर्वात मोठे डिजिटल एन्टरटेन्मेंट प्लॅटफॉर्म असणार आहे. ZEE5 'न्यू इंडिया'च्या गरजांना पूर्ण करणार आहे. झी इंटरनॅशनल आणि Z5 ग्लोबलचे सीईओ अमित गोयंका यांना या नव्या ब्रँडचे लॉन्चिंग केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



ZEE5मधील वैशिष्ट्ये 


ZEE5 पहिला डिजिटल एन्टरटेन्मेंट प्लॅटफॉर्म आहे. जे व्हॉइस आधारीत सर्चवर काम करणार यातील फिचर लाखो प्रेक्षकांना मनोरंजनाचे नवीन दालन खुले करणार आहे.  ज्यांना डिजीटलमध्ये गती नाही अशांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. प्रेक्षक कार्यक्रम किंवा मुव्हीचे नाव घेऊन सहज कन्टेंट शोधू शकणार आहे. 


- Zee5 कनेक्टिव्हीटी आणि कमी फोन स्टोअरच्या समस्येचे योग्य उत्तर आहे. 


- अॅप डाऊनलोड न करताही प्रेक्षक याचा आनंद घेऊ शकतात. 


- वायफायला जोडल्यानंतर कन्टेंट डाऊनलोड करण्याचा पर्याय आहे. त्यामुळे जसा वायफाय जोडला गेला तसा कन्टेंट डाऊनलोड होतो. आणि कोणताही डाटा खर्च होत नाही. हा डाटा सेव्ह झाल्यानंतर पुन्हा तु्म्ही डाटा पाहू शकतात. 


- शिवाय कन्टेंट एसडी/ मेमरी कार्डमध्ये सेव्ह करण्याची सुविधा उपल्बध आहे. त्यामुळे फोन मेमरीवर जास्त लोड येत नाही. 



या भाषांमध्ये आहे अॅप उपलब्ध 


Zee5 एकूण १२ भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी, बंगाली, मल्याळम, तमिळ, तेलगु, कन्नड, उडिया, भोजपुरी, गुजराती आणि पंजाबीमध्ये उपलब्ध होणार आहे. या अॅपमध्ये व्हॉइस सर्चसारखा पर्याय उपलब्ध आहे. भारत आणि इंटरनॅशनल मूव्ही, टीव्ही शो, म्युझिक आणि लाइफ स्टाइल व्हिडिओ विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. 


 


येथून डाऊनलोड करा अॅप 


ZEE5 अॅपला तुम्ही गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) आणि  iOS अॅप स्टोअरमधून डाऊनलोड करू शकतात.  हे प्रोग्रेसिव वेब अॅप (PWA)आहे. ते  www.zee5.com आणि Android TV,आणि  Amazon Fire TV Stick वरही उपलब्ध आहे.  ZEE5 क्रोमकास्टलाही सपोर्ट करत आहे. 


असा रंगला सोहळा...