म्यानमारच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी महाराष्ट्रात बांधलेला गुप्त राजवाडा; आजही इथे...

म्यानमारच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी महाराष्ट्रात  गुप्त राजवाडा वांधण्यात आला होता. कोणी आणि का बांधला होता हा राजवाडा? कुठे आहे हा राजवाडा जाणून घेऊया.  

वनिता कांबळे | Updated: Mar 29, 2025, 07:04 PM IST
म्यानमारच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी महाराष्ट्रात बांधलेला गुप्त राजवाडा;  आजही इथे...

Ratnagiri Thiba Palace : महाराष्ट्रात गड किल्यांसह अनेक एतिहासिक वास्तू आहे. अशीच एक वास्तू कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे. ही वास्तू म्हणजे थिबा पॅलेस. म्यानमारच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी हा गुप्त राजवाडा बांधण्यात आला होता. जाणून घेऊया कोणी आणि का बांधला होता हा राजवाडा? आज राजवाडा कोकणातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. 

Add Zee News as a Preferred Source

थिबा पॅलेस

ब्रिटीशांनी बांधलेल्या या राजवाड्याचे नाव आहे थिबा पॅलेस. हा राजवाडा रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ आहे. थिबा राजवाडा हा ब्रम्हदेशच्या(आत्ताचं म्यानमार) थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधला होता. थिबा राज्याच्या नावावरुनच या राजवाड्याला थिबा पॅलेस असे नाव देण्यात आले आहे.  1910 मध्ये हा राजवाडा बांधम्यात आला होता. 1916 पर्यंत या राजवाड्यात म्यानमारचा राजा आणि राणी वास्तव्यास होते. आता या राजवाडयात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय उभारण्यात आले आहे. या राजवाड्यात थिबा राजाने वापरलेल्या अनेक गोष्टी अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत.

राजवाड्यातून दिसतो सुंदर थिबा पॉईंट

हा राजवाडा तीन मजली आहे.  राजवाड्याचे बांधकाम अतिशय सुंदर आहे. कौलारु छत असलेला हा भव्य दिव्य राजवाडा पाहून पर्यटक थक्क होतात. राजवाड्यातील सुंदर कोरीव काम असलेल्या अर्ध-परिमिती लाकडी खिडक्या या संरचनेचे मुख्य आकर्षण आहेत. पहिल्या मजल्यावर संगमरवरी मजल्यासह एक नृत्य कक्ष आहे. राजवाड्याच्या मागच्या बाजूला एक बुद्ध मूर्ती स्थापित केली आहे. ही मूर्ती राजा थिबा यांनी भारतात आणली होती. या राजवाड्यातून सोमेश्वर नदी खाडी, भाट्ये समुद्र किनारा यांचे अतिशय मनमोहक दृष्य दिसते. याला थिबा पाईंट असेही म्हणतात. थिबा पाईंट सूर्यास्तासाठी देखील प्रसिद्ध आहे.  सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत थिबा पॅलेसला भेट देऊ शकता. 

थिबा पॅलेसला जायचे कसे?

रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरुन थेट रिक्षा करुन तुम्ही थिबा पॅलेसला पोहचू शकता. साधारण 25 ते 30 मिनिटांचा हा प्रवास आहे. बस ने प्रवास करत असल्यास रत्नागिरी बस स्थानकात उतरुन तिथून रिक्षाने अवघ्या 10 ते 15 मिनीटांत येथे पोहचता येईल. थिबा पॅलेसला भेट दिल्यानंतर जवळ असणारा भाटे समुद्र किनारा, मत्सालय, पांढरा समुद्र तसेच मांडवी बीच तसेच रत्नदुर्ग या जवळच्या ठिकाणांना देखील भेट देऊ शकता. 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More