विदर्भातील जेवण पद्धती अतिशय खास आहे. यामध्ये 'तर्री पोहे', 'सावजी मटण' आणि 'वांग्याची भाजी' यासोबतच आणखी एक पदार्थ लोकप्रिय आहे. तो म्हणजे गिला वडा. मुंबईत जसा 'वडापाव' लोकप्रिय आहे तसाच अमरावतीचा स्ट्रीट फुड पदार्थ म्हणजे 'गिला वडा'


गिला वडाचा इतिहास 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावतीचा गिलावडा हा मुळातच अमरावतीचा नाही. गिलावडा हा जरी अमरावतीत फेमस झाला तरी हा मुळचा बुंदेलखंडचा पदार्थ आहे. बुलेंदखंडचे लोक लग्नसमारंभात कुलदैवतांना गिला वड्याचा नैवद्य द्यायचे. नंतर या गिला वड्याची क्रेझ इतकी वाढली की, लग्न समारंभातील मेन्यूमध्ये दिसू लागला.  बुंदेलखंडचे लोक मोठ्या संख्येने 1960 रोजी अमरावतीत स्थायिक झाले. आणि मग हा गिला वडा हा पदार्थ अतिशय लोकप्रिय झाला. 


गिला वड्यातील सामुग्री अतिशय पौष्टिक आहे. उडीद डाळीपासून हा पदार्थ तयार केला जातो. अमरावतीतील प्रत्येक व्यक्तीने गिला वडाची टेस्ट चाखलेली असते. गिला वड्याचे साहित्य अमरावतीकर असा दावा करतात की, महाराष्ट्रात इतर कुठेही तो मिळत नसल्याचा दावा येथील व्यावसायिक करतात. 80 च्या दशकात काहींनी गिला वड्याचा व्यवसाय सुरु केला. आज व्यावसायिकांची संख्या लाखोंच्या घरात पोहोचली आहे. उडीद डाळापासून तयार केलेला हा पदार्थ अतिशय पाचक आणि हेल्दी आहे. 


गिवा वड्याची रेसिपी


  • 2 कप उडदाची डाळ

  • 1/2 लीटर दही

  • 1/4 किलो शेव फरसाण

  • 1 कप चिंच गुळाची चटणी

  • 1 कप पुदिना मिरचीची तिखट चटणी

  • 2 कांदे बारीक चिरुन

  • कोथिंबीर बारीक चिरुन

  • मीठ चविनुसार

  • चाट मसाला चविनुसार

  • तिखट चविनुसार

  • 1 चमचा मिरेपुड

  • तेल आवश्यकतेनुसार


कृती


  • चार पाच तास उडिद दाळ पाण्यात भिजू टाका

  • त्यानंतर मिक्सरमधून ही दाळ बारीक करावी.

  • दाळीच्या मिश्रणात थोडं पाणी आणि चवीनुसार मीठ टाकावं.

  • त्यानंतर या मिश्रणाचे गरम तेलातून वडे काढावे.

  • त्यानंतर तळलेले वडे पाण्यामध्ये भिजवावे आणि वडे तळहातावर घेऊन दुसऱ्या हाताने प्रेस करावे.

  • त्यानंतर वरुन दही, चटणी, शेव, कांदा, लिंबू टाकून सर्व्ह करावे.