Baby Names : बुद्ध पौर्णिमेला जन्मलेल्या मुलांसाठी अनोखी नावे अन् अर्थ देखील

बुद्धपौर्णिमेच्या दिवशी घरी गोंडस बाळाचा जन्म झाला तर त्याच्यासाठी निवडा खालीलपैकी एक अनोखं असं नाव. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 11, 2025, 09:06 PM IST
Baby Names : बुद्ध पौर्णिमेला जन्मलेल्या मुलांसाठी अनोखी नावे अन् अर्थ देखील

जर तुम्ही तुमच्या मुलासाठी नाव शोधत असाल तर फक्त हिंदू नाव ठेवणे आवश्यक नाही. तुम्ही तुमच्या मुलांना बौद्ध धर्माशी संबंधित नावे देखील देऊ शकता, कारण बौद्ध धर्माची उत्पत्ती हिंदू धर्मातून झाली आहे. बौद्ध धर्मातही काही लोकप्रिय नावे आहेत, त्यापैकी काही भगवान बुद्धांशी संबंधित आहेत, जी धार्मिक तसेच अद्वितीय आणि आधुनिक आहेत. अशा परिस्थितीत, या लेखात भगवान बुद्ध आणि बौद्ध धर्माशी संबंधित काही नावे नमूद केली आहेत, त्यापैकी कोणतीही नावे तुम्ही तुमच्या मुलासाठी निवडू शकता.

बुद्धांच्या नावावरुन मुलांसाठी नावे आणि अर्थ 

गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्माशी संबंधित नावे

अतिद - या नावाचा अर्थ सूर्य आहे.
अनुरक - थाई पौराणिक कथेनुसार, या नावाचा अर्थ पुरुष देवदूत असा होतो.
तथागत - भगवान बुद्धांशी संबंधित एक सुंदर नाव.
निर्वाण - या नावाचा अर्थ शून्यतेची अवस्था प्राप्त करणे असा आहे.
अनुमान - गौतम बुद्धांशी संबंधित नाव. याचा अर्थ संयम.

जर तुम्ही मुलांसाठी अनोखी आणि आधुनिक नावे शोधत असाल तर येथे क्लिक करा.

इशिन - या नावाचा अर्थ बुद्धिमान असा होतो.
मुनिष - भगवान बुद्धांशी संबंधित एक नाव.
न्यान - या नावाचा अर्थ हुशार आहे.
न्युंत - या नावाचा अर्थ भरभराट होणे असा होतो.
दीपंकर - शांततेत राहायला आवडणारी व्यक्ती.

आणखी काही नावे 

आरुष- या नावाचा अर्थ सूर्याचे प्रतीक आहे.
वेदांत- या नावाचा अर्थ ज्ञानाचे प्रतीक आहे.
अद्विक - भगवान विष्णूशी संबंधित एक नाव.

अविक- भीतीवर विजय मिळवलेली व्यक्ती.
आर्यव - भगवान विष्णूच्या आदर्शांचे पालन करणारा व्यक्ती.
यज्ञेश - या नावाचा अर्थ त्याग आहे.

विश्वम् - विश्वाचा स्वामी.
शुभांगा - ज्याचे स्वरूप सर्वात सुंदर आहे.
निवान् - जो मुक्ती देतो.
विवान - जो जीवन देतो.