Home Decor Tips : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले भारत गणेशपुरे सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. आपली अनोखी विदर्भ शैली आणि विनोदी अभिनयामुळे प्रेक्षकांच मन जिंकत असतात. भारत गणेशपुरे यांच्यासह त्याच्या सहकलाकारांची मेहनत आपण पाहतो. या मेहनतीला मोहर तेव्हाच लागते जेव्हा त्यांची प्रगती होत जाते.
भारत गणेशपुरे यांनी असाच एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये त्यांच्या कष्टाला यश आलं आहे. काही वर्षांपूर्वी भारत गणेशपुरे यांना म्हाडाचं घर लागलं. भारत गणेशपुरे यांनी या म्हाडाच्या घराचा कायापालट केलाय. महत्त्वाची बाब म्हणजे हा होम डेकोर व्हिडीओ पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही की, हे म्हाडाचं घर आहे. या घराचं इंटिरियर ‘Bricks And Bronze’ यांनी केलं आहे.
आपल्याला माहितच आहे भारत गणेशपुरे हे विदर्भाचे आहे. नावाच्या पाटीला विदर्भीय टच देत 'भारत गणेशपुरे... बे' असा दिला आहे. नावाची पाटी ही घराची पहिली ओळख असते. त्यामुळे तुम्ही देखील हा पर्याय निवडू शकता.
भारत गणेशपुरे यांची अतिशय साधी राहणी आहे पण त्यांच्या घराला मॉर्डन टच दिल्याच पाहायला मिळतं. उत्तम रंगसंगती आणि छोट्या छोट्या गोष्टींनी घराला मॉर्डन टच दिला आहे. अगदी घरात असलेले दोन घड्याळ खूप वेगळे आहेत.
भारत गणेशपुरे यांच्या घरात सर्वात जास्त पांढऱ्या रंगाचा वापर केला आहे. या घरातील प्रत्येक भाग सफेद आहे. घराजवळच सुंदर निसर्ग लाभल्यामुळे या गोष्टी जुळून आल्या आहेत. किचनमध्ये पांढऱ्या रंगाच्या टाईल्सदेखील बसवण्यात आलं आहे. किचनला मॉर्डन आणि पारंपरिक असा टच देण्यात आलाय.
भारत गणेशपुरे यांनी मुलाला वेगळी रुम दिली आहे. यामध्ये सगळ्या गाड्या पाहायला मिळतात. मुलाने बालपणीची आठवण जपून ठेवली आहे. मुलाच्या सिस्टमसाठी वेगळी जागा ठेवण्यात आली आहे. मुलाच्या खोलीप्रमाणेच देवघरही अतिशय सुंदर आहे. लाकडाचा टच असलेला या देवाऱ्हातील देव तुमचं लक्ष वेधून घेतो. मुलाच्या रुममध्ये ट्रान्सपरंट वॉर्डरॉब असून भारत गणेशपुरे यांचा देखील बेडरूम छान आहे.
भारत गणेशपुरे यांनी पुरस्कारांचा खास सन्मान केला आहे. आपल्या अभिनयाची पोचपावती असलेले पुरस्कार दिमाखात उभे आहेत.